Mon, Jul 15, 2019 23:43होमपेज › Solapur › उजनी प्लसमध्ये,  मायनसचा विळखा निसटला

उजनी प्लसमध्ये,  मायनसचा विळखा निसटला

Published On: Jul 18 2018 9:25AM | Last Updated: Jul 18 2018 9:25AMबेंबळे : वार्ताहार

उजनी धरणाने मायनसचा विळखा तोडुन प्लसमध्ये प्रवेश केला आहे मंगळवारी सायंकाळी ५ वाजता प्लसमध्ये प्रवेश केला. विशेष म्हणजे गतवर्षी प्रमाणे जुलै महिन्यात उजनीने प्लसमध्ये प्रवेश केल्याने उजनी धरण शंभर नव्हे ११० टक्‍के भरण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. भीमा नदीत आषाढी वारीसाठी सोडण्यात आलेले पाणी पूर्ण  बंद केले आहे.

उजनीचे अधिक्षक अभियंता शिवाजी चौगुले यांनी यावर्षी उजनीच्या पाण्याचे नियोजन काटेकोरपणे केल्याने उजनी मायनस पातळी फक्त -19.82 % पर्यंतच्या खाली आले होते. त्यामुळे उजनीचा मायनसचा विळखा लवकर निसटला आहे.

उजनीत येणाऱ्या विसर्गात मोठी वाढ होत आहे. खडकवासला व त्यावरील साखळी धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने चांगलीच हजेरी लावत त्यात सातत्य राहिल्याने खडकवासला शुभर टक्‍के झाले होते. गेल्या दोन दिवसांपासून या धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे.

कलमोडी.2134
वडिवले..3260 
कासारसाई..700
डिंभे ...2675
या पाच धरणातून 22669 क्युसेक  पाणी  नदीत सोडण्यात येत होते. येवा वाढल्यास उद्या सकाळी नदीत पाणी सोडण्याचे प्रमाण वाढू शकते. पानशेत धरणात 73% वरसगाव येथे 46 व टेमघर धरणात 47  टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. 

त्यामुळे उजनी धरणात येणाऱ्या विसर्गात वाढ होणार आहे. दौंड येथून येणाऱ्या विसर्गात काल घट झाली होती. पण वरील धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात केल्यामुळे घटलेला विसर्ग पुन्हा वाढू लागला आहे. 

आजपर्यंत उजनीत फक्त भीमा खोऱ्यात लोणावळा, खेड, मावळ, भीमाशंकर, आंबेगाव, शिरूर या भागात पडत असलेल्या पावसाचे पाणी येत होते. परंतु, आता खडकवासला प्रकल्प साखळीतील खडकवासला धरणातून पाणी येणार असल्यामुळे उजनी धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होण्याची शक्यता निर्माण झाले आहे.

उजनी धरण व त्यावरील 19 धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला असून त्याचा परिणाम दौंड व बंडगार्डन येथून येणाऱ्या विसर्गात वाढ होवू लागली आहे. त्यामुळे उजनी धरणाचा मायनसचा विळखा आज सुटला आहे. 

सध्या उजनीची पाणीपातळी 

एकुण पाणीसाठा...491.500 मी.

एकुण पाणीपातळी ..1897.72 दलघमी

उपयुक्त पाणीपातळी .94.91 दलघमी 

टक्केवारी ...+6.26%

विसर्ग ...

उजनीतून भीमा नदी विसर्ग  बंद

बंडगार्डन 11737क्युसेक 

दौंड....46227क्युसेक ...