Wed, Jul 24, 2019 15:17



होमपेज › Solapur › उजनीतून आजपासून शेतीसाठी पाणी सोडण्याचा निर्णय

उजनीतून आजपासून शेतीसाठी पाणी सोडण्याचा निर्णय

Published On: Jan 10 2018 7:42PM | Last Updated: Jan 11 2018 10:27AM

बुकमार्क करा




टेंभुर्णी : प्रतिनिधी

उजनी धरणातून शेतीसाठी कालव्यातून पाणी सोडण्याचा निर्णय मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती आ. बबनराव शिंदे यांनी दूरध्वनीवरून दिली.
याबाबत अधिक माहिती देताना आ. शिंदे म्हणाले की, गतवर्षी भरपूर पाऊस झाल्याने 15 ऑक्टोबर 2017 रोजी उजनीत 111 टक्के पाणीसाठा झाला होता. पाणी मुबलक उपलब्ध असल्याने 15 नोव्हेंबर 2017 पासून कालव्यात सोडण्यात येणारे पाण्याचे आवर्तन एक महिन्यासाठी पुढे ढकलण्यात आले होते. सध्या उजनीत 104 टक्के पाणीसाठा आहे. उजनीचा मुख्य कालवा 20 कि.मी., उजवा कालवा 119 कि.मी. व डावा कालवा 126 कि.मी.पर्यंतच्या लाभक्षेत्रातील पिकांना पाण्याची नितांत आवश्यकता आहे. या आवर्तनाची शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत. 

याबाबत सातत्याने पाठपुरावा केल्याने बुधवारी मुंबईत जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सहकारमंत्री सुभाष देशमुख, आ. भारत भालके, अधीक्षक अभियंता शिवाजी चौगुले आदींच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत पाणी सोडण्याचा निर्णय झाला.