Sat, Mar 23, 2019 12:36होमपेज › Solapur › उजनी धरण अर्धे भरले

उजनी धरण अर्धे भरले

Published On: Aug 19 2018 1:34AM | Last Updated: Aug 18 2018 8:58PMबेंबळे : प्रतिनिधी

सोलापूर जिल्ह्यातील सर्वांच्या नजरा लागलेल्या उजनी धरणात होत असलेल्या विसर्गामुळे उजनी धरण 50 टक्क्यांहून अधिक भरले असून, वरील धरणांमधून विसर्ग असाच राहिल्यास उजनी लवकरच 100 टक्के भरण्याची अपेक्षा व्यक्‍त केली जात आहे. 

दरम्यान, दौंड येथून सध्या 37 हजार 863 क्युसेकचा विसर्ग उजनी धरणात येत आहे. त्यामुळे उजनी धरणाची टक्केवारी वाढण्यास मदत होत आहे. वरील धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाने जोर धरला असून त्याचा परिणाम दौंड येथे येणार्‍या पाण्यावर झाला आहे. 

उजनी पाणीपातळी  अशी 

एकूण पाणीपातळी 494.350 मी., एकूण पाणीसाठा 2570.72 द.ल.घ.मी., उपयुक्‍त 

पाणीपातळी 767.91, टक्केवारी 50.61 टक्के.

विसर्ग- दौंड 37 हजार 863, बंडगार्डन 24 हजार 416, उजनीतून कालवा 3 हजार 250, बोगदा 900, सीना माढा 200, गेल्या दोन दिवसांत उजनी धरणात 12 टक्के पाणी आले आहे. आता उजनी धरणात 90 टीएमसी पाणी असून त्यातील 27 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. आणखी 27 टीएमसी पाण्याची गरज आहे. उजनीवरील 19 धरणांपैकी केवळ 2 टक्के धरणांचा पाणीसाठा अल्प आहे. बाकी सर्व धरणे 100 टक्क्यांजवळ आली आहेत. त्यामुळे थोडा जरी पाऊस पडला तर तो उजनी धरणात येणार आहे. आहे त्या विसर्गात उजनी 65 ते 70 टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

उजनी धरणात आवश्यक पाणीसाठा होऊ लागल्यामुळे शेतकरी नवीन ऊस लागण करण्यास सुरुवात करत आहेत. उजनीने पन्नासी ओलांडली म्हणजे आता उजनी 100 टक्के होणारच या आशेवर भीमा नदी, कालवा, बोगदा या परिसरात थांबलेल्या ऊस लागणी सुरु झाल्या आहेत.