Wed, Jun 26, 2019 18:12होमपेज › Solapur › उजनी धरण ६५ टक्क्यांवर 

उजनी धरण ६५ टक्क्यांवर 

Published On: Aug 22 2018 12:10AM | Last Updated: Aug 22 2018 12:02AMबेंबळे  : प्रतिनिधी

उजनी धरणावरील 11 धरण क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे तब्बल 9 धरणे ओसंडून वाहात आहेत. या धरणांमधून सध्या 75 हजार 626 क्युसेकचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे बंडगार्डन व दौंड येथून उजनीत येणार्‍या विसर्गात रोजच वाढ होत असून उजनीची पाणीपातळी 65 टक्क्यांच्या पुढे गेली आहे. 

दरम्यान, उजनी धरणाची पाणीपातळी वाढत असल्यामुळे उपयुक्त पाणीसाठी केव्हाही 90 टक्के होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उजनी धरणातून विसर्ग सुरू होणार असल्याने भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

उजनीत सध्या दौंडमधून 53  हजार 461 क्युसेक, तर बंडगार्डन  येथून 38 हजार 608 क्युसेकने पाणी येत आहे. उजनीतून कालव्याद्वारे 3 हजार क्युसेक, बोगद्यातून 900 क्युसेक, तर सीना माढा कालव्यातून 240 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे.  

उजनी धरणात गेल्या आठ दिवसांत  40 टक्के पाणीसाठी वाढला आहे.  11 ऑगस्ट रोजी उजनी धरणाची पाणीपातळी 25 टक्के नोंदविण्यात आली होती. दरम्यान, गेल्या आठ दिवसांपासून पुणे, भीमाशंकर परिसरात पावसाने पुनरागमन केल्यामुळे उजनी धरणात दौंड येथून मोठ्या प्रमाणात पाणी येत राहिले. त्यामुळे उजनी धरणात येणार्‍या पाण्यात  सातत्य राहिले. त्यामुळे उजनी धरणातील पाणीसाठा 65 टक्क्यांहूनही पुढे गेला आहे.