Tue, Jul 16, 2019 00:21होमपेज › Solapur › भविष्यात उजनीसाठी सर्वपक्षीय लढा उभारावा लागेल

भविष्यात उजनीसाठी सर्वपक्षीय लढा उभारावा लागेल

Published On: Jan 23 2018 1:11AM | Last Updated: Jan 22 2018 10:29PMपंढरपूर: प्रतिनिधी

 उजनी धरणातून मराठवाड्याला पाणी देण्याचे काम अंतिम टप्यात आले आहे. 21 टी.एम.सी. पाणी मराठवाड्याला जाणार आहे.राज्यातील इतर धरणांचे योग्य व तंतोतंत नियोजन होते. त्याप्रमाणे उजनीच्या पाण्याचे नियोजन होत नाही. त्यामुळे पाण्यासाठी सर्व पक्षीय लढा उभा करावा लागेल असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रांतिक सदस्य राजूबापू पाटील यांनी केले. 

पंढरपूर शहर व तालुका राष्ट्रवादीच्यावतीने येथील गाडगे महाराज मठामध्ये  तिळगुळ वाटप व पत्रकारांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रांतिक सदस्य आप्पासाहेब  जाधव, शहराध्यक्ष सुधीर भोसले,  तालुकाध्यक्ष अ‍ॅड.दिपक पवार, विद्यार्थी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष संकेत ढवळे, प्रा.जयवंत भंडारे, महिला शहराध्यक्षा रंजनाताई हजारे, युवती शहराध्यक्षा चारुशिला कुलकर्णी उपस्थित होते. 
याप्रसंगी बोलतांना तालुकाध्यक्ष अ‍ॅड.दिपक पवार म्हणाले की, मोठ- मोठ्या शक्ती आमच्यासमोर उभ्या असतांनाही तालुका व शहरात रस्त्यावरील खरा विरोधक म्हणून आम्ही काम करीत आहोत.

स्त्यावरचे विरोधक म्हणून आम्ही आमचे काम चोख पार पाडत असतांना पत्रकारांनी आम्हाला आजपर्यत चांगली साथ दिली आहे.   याप्रसंगी शहराध्यक्ष सुधीर भोसले, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनिल उंबरे, पंढरपूर पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रविण नागणे, यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी पत्रकार संघांच्या पदाधिकार्‍यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी शहर सरचिटणीस म्हणून पांडुरंग पुणेकर व सहसंघटक म्हणून सचिन कदम यांची निवड करण्यात आली. यावेळी अल्पसंख्यांक सेलचे शहराध्यक्ष रशीद शेख, रहीम शेख, गिरीष चाकोते, आण्णा कोळी, प्रकाश थिटे, श्रीकांत शिंदे, संदीप गाजरे, यांच्यासह मोठ्या संख्येने पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार विजय काळे यांनी मानले.