Thu, Sep 20, 2018 05:55



होमपेज › Solapur › पंढरपूर : एसटी बसच्या धडकेत २ युवक ठार

पंढरपूर : एसटी बसच्या धडकेत २ युवक ठार

Published On: Feb 09 2018 6:37PM | Last Updated: Feb 09 2018 6:37PM



पंढरपूर : प्रतिनिधी

पंढरपूर येथील यात्रेकरिता सोलापूरहून निघालेले दोन युवक राज्य परिवहन महामंडळाच्या बसच्या धडकेत सुस्ते ( ता. पंढरपूर) येथे ठार झाले. संतोष श्याम भास्कर आणि ऋषीकेश ज्योतिराम संकपाळ ( वय 26, रा. सय्यद वरवडे, ता. मोहोळ) अशी मृतांची नावे आहेत.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे, पंढरपूर येथे गवळी समाजाची पारंपरिक यात्रा शुक्रवार ( दि 9 रोजी) होती. या यात्रेसाठी सोलापूरहून मोटार सायकल ( क्रमांक एम. एच. 13, सीए 3330) वरून पंढरपूरकडे निघाले होते. सुस्ते येथे आल्यानंतर त्यांनी पेट्रोल पंपावर मोटार सायकलमध्ये पेट्रोल भरले. आणि पंपावरून बाहेर येऊन पंढरपूरकडे निघाले असता समोरून येणारी राज्य परिवहन महामंडळाच्या बसने ( क्रमांक mh 14, bt 3432 )  त्‍यांच्या गाडीला धडक दिली. यामध्ये एक युवक जागीच ठार झाला. तर, दुसऱ्या युवकाचा उपचारासाठी पंढरपूरकडे नेत असताना मृत्यू झाला. पुढील तपास पोलिस करीत आहेत.