Tue, May 21, 2019 12:08होमपेज › Solapur › बार्शीत दोन महिलांना मारहाण

बार्शीत दोन महिलांना मारहाण

Published On: Jan 21 2018 2:57AM | Last Updated: Jan 20 2018 8:39PMबार्शी : तालुका प्रतिनिधी

पिठाच्या गिरणीमध्ये दळण दळण्याच्या कारणावरूण एकाने दोन महिलांना मारहाण करून जखमी केल्याची घटना बार्शी शहरातील उपळाई रोड भागात घडली. वैशाली परशुराम बोरगावकर (वय 30) व अन्नपूर्णा बोरगावकर अशी मारहाणीत जखमी झालेल्या महिलांची नावे आहेत. मनोज शंकर जगदाळे (रा.उपळाई रोड, बार्शी) असे मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे.  वैशाली बोरगावकर या महिलेने बार्शी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांच्या शेजारी राहणार्‍या मनोज जगदाळे यांची पिठाची गिरणी आहे. बोरगावकर हे दळण दळण्यासाठी जगदाळे यांच्या पिठाच्या गिरणीत जात नसल्यामुळे याचा राग मनात धरून जगदाळे यांनी फिर्यादीच्या घरात घुसून शिवीगाळ केली. शिवीगाळ करू नका, घरातून निघून जावा, असे म्हटले असता फिर्यादीस हाताने मारहाण करून ढकलून देऊन जखमी केले. याबाबत वैशाली बोरगावकर या महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून जगदाळे यांच्या विरूद्ध घरात घुसून शिवीगाळ करून मारहाण करत जखमी केल्याप्रकरणी बार्शी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.