Thu, Jun 20, 2019 00:33होमपेज › Solapur › पंढरपुरात अकलूजच्या व्यापाऱ्यावर हल्ला, लुटण्याचा प्रयत्न फसला

पंढरपुरात अकलूजच्या व्यापाऱ्यावर हल्ला

Published On: Apr 24 2018 9:03PM | Last Updated: Apr 24 2018 9:02PMपंढरपूर : प्रतिनिधी

अकलूज येथील व्यापारी पंढरपुरात खरेदीसाठी आला असता मंगळवारी सायंकाळी ७.३० च्या सुमारास या व्यापाऱ्यांवर दोघा अज्ञातांनी कोयत्याने हल्ला करून लुटण्याचा प्रयत्न केला. व्यापाऱ्याने प्रसंगावधान दाखवून पळ काढल्याने त्याचा जीव वाचला . 

मंगळवारी अकलूज येथील एक व्यापारी ( नाव अद्याप समजले नाही ) पंढरपूर येथील सारंग फडे यांच्याकडे माल खरेदीसाठी आला होता. तेथून तो पालिकेसमोरील बोळातून जात असताना संध्याकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास अंधाराचा फायदा घेऊन अज्ञात दोघांनी त्याच्यावर कोयत्याने हल्ला केला. मात्र, प्रसंगावधान दाखवून या व्यापाऱ्याने सुरक्षित ठिकाणी धूम ठोकली आणि पुन्हा सारंग फडे यांच्या दुकानात आश्रय घेतला. 

घटनेचे वृत्त पंढरपूर शहरात वाऱ्यासारखे पसरले. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून हल्लेखोरांचा तपास करीत आहेत. दरम्यान नुकत्याच झालेल्या संदीप पवार खुनामुळे पंधरपूरकर दहशतीखाली असताना ही घटना घडल्यामुळे अजूनही गुन्हेगारी जिवंत असल्याचे दिसून येत आहे.