Tue, Aug 20, 2019 16:04होमपेज › Solapur › मोहोळ : दोन वेगवेगळ्या ठिकाणी महिलांची गळफास घेऊन आत्महत्या 

मोहोळ : दोन वेगवेगळ्या ठिकाणी महिलांची गळफास घेऊन आत्महत्या 

Published On: Apr 23 2019 7:48PM | Last Updated: Apr 23 2019 7:51PM
मोहोळ : प्रतिनिधी 

मोहोळ तालुक्यातील सय्यद वरवडे येथे १९ वर्षीय तरुणीने आणि यावली येथे २२ वर्षीय विवाहितेन अज्ञात कारणाने गळफास घेऊनआत्महत्या केल्याची घटना २३ एप्रिल रोजी घडली. या दोन्हीही घटनांची नोंद मोहोळ पोलिस स्‍टेशनमध्ये करण्यात आली आहे. काजल उत्तम माने (वय १९, रा. सय्यद वरवडे) आणि राजश्री अजितकुमार जाधव (वय २२, रा. यावली) अशी मृतांची नावे आहेत.

पहिली घटना २३ एप्रिल रोजी सकाळी साडेदहा वाजता सय्यद वरवडे ता. मोहोळ येथे घडली असून, काजल उत्तम माने या तरुणीने अज्ञात कारणाने शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेची खबर अक्षय उत्तम माने यांनी मोहोळ पोलिसात दिली आहे.

तर दुसरी घटना दुपारी दीड वाजता यावली ता. मोहोळ येथे घडली असून, राजश्री अजितकुमार जाधव या विवाहितेने अज्ञात कारणाने राहत्या घरात लोखंडी अँगलला दोरीच्या साह्याने गळफास घेवून आत्महत्या केली. या घटनेची खबर गुंडू विश्वनाथ जाधव यांनी पोलिस स्‍टेशनमध्ये दिली आहे. 

या दोन्ही घटनांची नोंद मोहोळ पोलिस स्‍टेशनमध्ये करण्यात आली असून, सहाय्यक पोलिस निरीक्षक येडगे हे तपास करीत आहेत. मात्र दोन्ही घटनांमधील आत्महत्या ग्रस्त महिलांनी कोणत्या कारणाने आत्महत्या केली. हे अद्याप स्पष्ट होवू शकले नाही. त्यामुळे त्यांच्या मृत्युचे गुढ वाढले आहे.