Tue, Feb 19, 2019 13:06होमपेज › Solapur › सोलापूर : खुनप्रकरणी दोघा मित्रांना अटक

सोलापूर : खुनप्रकरणी दोघा मित्रांना अटक

Published On: Feb 07 2018 4:28PM | Last Updated: Feb 07 2018 4:28PMनातेपुते : प्रतिनिधी

शाळेमध्येच धारदार शस्त्राने वार करून मित्राचा खून केल्याप्रकरणी नातेपुते पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. विश्वजीत बारिकराव यमगर (वय, 16 रा. पिरळे ता. माळशिरस) आणि सतिश लोखंडे (वय 21 रा. पिरळे ता. माळशिरस) अशी अटक केलेल्या दोघा आरोपींची नावे आहेत. 

अटक करण्यात आलेले दोघेही बारामती तालुक्यातील नीरा-वागज या गावात पाहुण्यांकडे लपून बसलेले होते. पोलिसांनी छापा टाकून त्‍यांना ताब्‍यात घेतले.  ताब्‍यात घेतलेल्‍या आरोपींनी गुन्हा कबूल केला असून, प्रेम प्रकरणातूनच आपण महेश कारंडे याचा खून केला असल्याचे सांगितले. 

आरोपी सतिश गेल्‍या तीन वर्षापासून शाळा सोडून घरी होता. यावर्षी त्याने दहावीला समता माध्यमिक विद्यालयात प्रवेश  घेऊन बोर्डाचा परीक्षा फॉर्म भरला होता, अशी माहिती समोर आली आहे.

पिरळे (ता. माळशिरस) येथील समता माध्यमिक विद्यालयातील इ. दहावीच्या वर्गात शिकत असलेल्या महेश किसन कारंडे (वय 16) या विद्यार्थ्याचा विश्वजीत आणि सतिश यांनी विद्यालयातील संगणक रूममध्ये शाळा चालू असताना खून केला होता. मंगळवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास कोयत्याने वार करून खून केल्यानंतर हे दोन्ही आरोपी विद्यार्थी पळून गेले होते.