Fri, Jul 19, 2019 16:48होमपेज › Solapur › सोलापूरात जन्‍मले सयामी जुळे बाळ

सोलापूरात जन्‍मले सयामी जुळे बाळ

Published On: Apr 13 2018 1:24PM | Last Updated: Apr 13 2018 1:24PMसोलापूर : प्रतिनिधी

दोन तोंड, दोन अन्ननलिका, दोन श्‍वसननलिका आणि धड मात्र एक अशा प्रकारचे सयामी जुळे बाळ सिव्हील हॉस्पिटलमध्ये नुकतेच जन्मले आहे. ज्यावर येथील डॉक्टर संशोधन करून यापुढे अशा घटना टाळता येतील यावर संशोधन करत आहेत.

सोलापूरातील रहिवासी एक महिला प्रसूतीसाठी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालरात गुरूवारी दाखल झाली. प्रसूती कळा येत असल्याने त्यांची सूतीपूर्वी  सोनोग्राफी करण्यता आली. त्यामध्ये पोटात दोन तोंडे असलेले बाळ असल्‍याची डॉक्टरांना आढळले. डॉक्टरांनी त्या मातेला आणि त्‍यांच्या कुटुंबाला याची माहिती दिली.यानंतर त्या मातेने स्त्री जातीच्या सयामी जुळ्या बाळाला जन्म दिला. त्या बाळाचे वजन तीन किलो नऊशे ग्रॅम  आहे. दोन तोंडं, दोन अन्ननलिका, दोन श्‍वसननलिका असलेल्रा बाळाला शरीर मात्र एकच आहे. जी लाखातील एक आणि सिव्हील हॉस्पिटलमधील पहिलची घटना असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.  

या बाळाच्या कुटुंबीयांची ओळख सिव्हिल प्रशासनाने गुप्त ठेवली आहे. अधिष्ठाता डॉ. सुनील घाटे यांच्या मार्गदर्शनाखाली स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. विद्या तिरनकर, बालरोग चिकित्सा विभागातील डॉ. एस. व्ही. सावस्कर, बालरोग चिकित्सक डॉ. सुदर्शन चक्रे, बालरोग शल्रचिकित्सक डॉ. रवी कंदलगावकर हे सयामी जुळे बाळ आणि त्याच्या आईवर उपचार करीत आहेत. 

सयामी जुळे बाळावर होणार संशोधन 

गर्भ तयार होतानाच याची सुरूवात होते. आई-वडिलांसाठी हे बाळ दु:ख देणारे असले तरी वैद्यकीय विद्यार्थ्यांना शास्त्रीय अभ्यास करण्यासाठी ही चांगली संधी आहे. ज्या संशोधनातून यापुढे असे बाळ जन्माला येणार नाही. यावर संशोधन करता येईल. बाळाच्या हृदयाची गती जास्त आहे. 

- डॉ. सुनील घाटे, अधिष्ठाता