Sun, Mar 24, 2019 16:46होमपेज › Solapur › तुंगत येथे प्रवेशद्वारावर झेंडा  लावल्याने दोन समाजांत तणाव

तुंगत येथे प्रवेशद्वारावर झेंडा  लावल्याने दोन समाजांत तणाव

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

तुंगत : वार्ताहर

 तुंगत (ता. पंढरपूर) येथे प्रवेशद्वारावर एका समाजाचा झेंडा लावलेला असताना तेथे दुसर्‍या समाजाचा झेंडा लावल्याने गावात तणाव निर्माण झाला. गावकर्‍यांनी दुकाने बंद ठेवून पंढरपूर-मोहोळ रस्ता रोखून धरत आंदोलन केले. तब्बल चार तास वाहतूक बंद राहिली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत गावकर्‍यांशी चर्चा करत दोन्ही झेंडे काढून टाकत वाद मिटवला. दुपारनंतर गावातील व्यवहार सुरळीत सुरू झाले.

तुंगत येथील प्रवेशद्वारावर पहिल्यापासून एका समाजाचा झेंडा लावलेला होता; मात्र या ठिकाणी दि. 1 एप्रिल रोजी मध्यरात्री अज्ञाताने तेथे जातीय तणाव निर्माण करण्याच्या उद्देशाने दुसर्‍या समाजाचा झेंडा लावला. हा प्रकार सोमवारी सकाळी तरुणांच्या लक्षात आला. त्यामुळे तरुणांनी एकत्र येत गावातील सर्व व्यवहार बंद ठेवले. त्याचबरोबर पंढरपूर-मोहोळ रस्ता रोखून धरत आंदोलन सुरू केले. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी निीखल पिंगळे, कृष्णदेव खराडे हे पोलिस फौजफाट्यासह दाखल झाले. आंदोलनकर्त्यांशी चर्चा करण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र लावण्यात आलेला झेंडा काढल्याशिवाय आंदोलन थांबविणार नसल्याची भूमिका तरुणांनी घेतल्याने अप्पर पोलिस अधीक्षक मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी निखील पिंगळे, तहसीलदार  मधुसूदन बर्गे यांनी गावातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलिस पाटील, तंटामुक्‍ती अध्यक्ष यांच्याशी चर्चा करून प्रवेशद्वारावरील दोन्ही झेंडे काढण्याचा निर्णय घेतला. झेंडे काढताना जमावातून गोंधळ वाढू लागल्याने अखेर पोलिसांना जमाव पांगवण्यासाठी लाठीचार्ज करावा लागला. दोन्ही झेंडे उतरवून घेत पंढरपूर मोहोळ रस्त्यावरील वाहतूक सुरळीत सुरू करण्यात आली.  त्याचबरोबर गावातील व्यवहार सुरळीत सुरू करण्यात आले.

दरम्यान झेंडा लावाणार्‍या समाज कंटकांस अटक करून त्याच्यावरती गुन्हे दाखल करण्याची मागणी पोलीस प्रशासनास करण्यात आली.  शोध घेतला नाही तर  8 एप्रिल रोजी सर्व ग्रमस्थांच्यावतीने परत एकदा रास्ता रोको करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
 


  •