Sun, Jul 21, 2019 05:35होमपेज › Solapur › फडणवीस, गडकरी आज तुळजापुरात 

फडणवीस, गडकरी आज तुळजापुरात 

Published On: Feb 13 2018 1:58AM | Last Updated: Feb 12 2018 9:57PMतुळजापूर : प्रतिनिधी

सांगवी-मार्डी येथील नियोजित विश्‍वकर्मा औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या शिलान्यास समारंभासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रा.स्व. संघाचे सरकार्यवाह भैय्याजी तथा सुरेश जोशी, लाहिरी गुरुजी यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. मंगळवारी सकाळी 10 वा. हा समारंभ पार पडणार आहे. भटक्या-विमुक्त विकास परिषद आणि भटक्या-विमुक्त विकास प्रतिष्ठान या संस्थांद्वारे चालविण्यात येणार्‍या यमगरवाडी सेवा प्रकल्पाच्या रौप्यमहोत्सवी वर्ष सांगता समारोह यावेळी होणार आहे.

भटक्या-विमुक्त जाती-जमातीतील मुलांसाठी यमगरवाडी येथे एकलव्य प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा, पालावरची शाळा चालवली जाते. या समारंभास उपस्थित राहण्याचे आवाहन सुवर्णा रावळ, डॉ. अभय शहापूरकर, महादेवराव गायकवाड, रावसाहेब कुलकर्णी यांनी केले आहे.