होमपेज › Solapur › रसिकांचा ‘राणा-अंजली’त जीव रंगला

रसिकांचा ‘राणा-अंजली’त जीव रंगला

Published On: Jan 12 2018 1:57AM | Last Updated: Jan 11 2018 10:34PM

बुकमार्क करा
सोलापूर : प्रतिनिधी

हुतात्मा स्मृती मंदिरच्या स्टेजवर ‘तुझ्यात जीव रंगला’ या प्रसिद्ध मालिकेतील राणा, अंजली व इतर सर्व कलाकार. त्यांनी सोलापूरकरांबरोबर साधलेला संवाद, त्यातून त्यांच्याकडून कॅन्सरची लास्ट स्टेज असताना ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेवर एक-एक दिवस जगणारी आजीबद्दलची गोष्ट आदींमुळे रसिकांचा ‘राणा-अंजली’त जीव रंगला असल्याचे बुधवारी दिसून आले.

स्मृती सांस्कृतिक व्यासपीठातर्फे हुतात्मा स्मृती मंदिर येथे बुधवारी, सायंकाळी साडेपाच वाजता ‘तुझ्यात जीव रंगला’ या सांस्कृतिक व कलाकार दर्शन सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी ‘तुझ्यात जीव रंगला’मधील कलाकारांनी सोलापूरकरांशी संवाद साधला. यावेळी मराठी व हिंदी गीतांचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन मराठी बाणा 701 एमएमचे निर्माते अशोक हांडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी व्यासपीठावर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, उज्ज्वला शिंदे, आमदार प्रणिती शिंदे, प्रिसीजनच्या सुहासिनी शहा, ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील नायक हार्दिक जोशी, नायिका अक्षया देवधर, अमोल नाईक, धनश्री काटगावकर, मिलिंद दास्ताने, राजू हंसनाळे, दिप्ती सोनवणे आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

यावेळी मिसेस इंडिया इंटरनॅशनल, श्रीलंका येथील उपविजेत्या निकीता बजाज-साळुंखे, राष्ट्रपती शौर्यपदक विजेते पोलिस सबइन्स्पेक्टर, पुणे येथील राजारामसिंह चौहान यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील राणा, अंजली, अमोल नाईक, धनश्री काटगांवकर, मिलिंद दास्ताने, राजू हंसनाळे, दिप्ती सोनवणे आदी कलाकारांची मुलाखत मंजुषा गाडगीळ यांनी घेतली. यावेळी राणादा यांनी सोलापूरला येऊन झ्याक वाटतयं म्हणून सांगितले. तर नायिका अंजली हिने माझे रिअल राईफमध्ये राणाशी एंगेजमेंट झाली नसून या अफवांवर विश्‍वास ठेवू नये, असे सांगितले. यावेळी इतरही कलाकारांनी आपले वैयक्तिक व पडद्यावरील आयुष्य यावर मिश्कीलपणे उत्तरे देत उपस्थित रसिकांची मने जिंकली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऑर्केस्ट्रा सिझर्ल्सतर्फे संतोष देशमुख आणि त्यांच्या सहकार्‍यांनी संगीतरजनी कार्यक्रम सादर केला.