Mon, Aug 19, 2019 07:23



होमपेज › Solapur › वर्‍हाडाचा ट्रक पलटी होऊन एक ठार; 32 जण जखमी

वर्‍हाडाचा ट्रक पलटी होऊन एक ठार; 32 जण जखमी

Published On: Apr 27 2018 11:01PM | Last Updated: Apr 27 2018 10:54PM



भोसे (क.) : वार्ताहर

लग्‍नासाठी निघालेला वर्‍हाडाचा ट्रक ड्रायव्हरचा ताबा सुटून पलटी झाल्याने या अपघातात एकजण ठार, तर 32 वर्‍हाडी जबर जखमी झाले आहेत. हा अपघात शुक्रवारी सकाळी 11 वाजता शेवते येथे झाला आहे. ज्ञानदेव निवृत्ती माळी (वय 72, रा. बार्डी) उपचारादरम्यान मयत झालेल्याचे नाव आहे.

बार्डी येथील संजय विठ्ठल बनकर यांच्या मुलीच्या लग्‍नासाठी ट्रकमधून वर्‍हाडी वेळापूरकडे निघाले होते. ट्रक भोसे-पटवर्धन कुरोली रोडवर शेवते गावाजवळ 8 मायनर येथे सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास आला असता ड्रायव्हरचा ताबा सुटून ट्रक पलटी झाला. या अपघातात रुक्मिणी शंकर माळी, तुषार जयवंत बनकर, हणुमंत भगवान माळी, मनीषा हणुमंत माळी, सुभ्रदा गोरख माळी, गंगुबाई दत्तात्रय माळी, सुरेश वसेकर, सुरेखा कवडे, सीताबाई ईश्‍वर शिंदे, 

ललीता कवडे, सोहम कवडे, सुगरण जालींदर माळी, जालींदर गोविंद माळी, सुनील दत्ता अहिरे, दत्तात्रय वसेकर, मच्छिंद्र पांडुरंग बनकर, शंकर सदाशिव बनकर, शालन खारे, नानासो खारे, हमेश हणुमंत वसेकर, सुदाम ब्रम्हदेव वसेकर, रामदास अरुण माळी, नवनाथ पांडुरंग माळी, अर्जुन नवनाथ माळी व इतर 7 ते 8 लोक असे एकूण 32 लोक जखमी झाले आहेत.  

सर्व जखमींना तत्काळ रुग्णवाहिकेतून पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या जखमीपैकी ज्ञानदेव निवृत्ती माळी (वय 72) रा.बार्डी हे उपचारादरम्यान मयत झाले आहेत. सर्व जखमींची प्रकृती चांगली असल्याचे सांगितले जाते. घटना घडताच ट्रक ड्रायव्हर घटनास्थळावरून पसार झाला आहे. संतप्त जमावाने ट्रकचा टफ व काचा फोडल्या आहेत. यात ट्रकचे 10 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेची फिर्याद समाधान ज्ञानदेव लाटे यांनी करकंब पोलिसात दिली असून सपोनि दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ. गोडसे अधिक तपास करीत आहेत.