होमपेज › Solapur › तुर डाळीचा ट्रक चढला दुभाजकावर (व्हिडिओ)

तुर डाळीचा ट्रक चढला दुभाजकावर (व्हिडिओ)

Published On: Aug 16 2018 2:38PM | Last Updated: Aug 16 2018 2:38PMसोलापूर : प्रतिनिधी

पहाटेचा अंधुक प्रकाश, पावसाची रिपरिप आणि समोरून प्रखर लाईट  असलेला ट्रक यामुळे तुर घेऊन निघालेला एक ट्रक दाट लोकवस्ती असलेल्या रस्त्याच्या दुभाजकावर (डिव्हायडर) चढला. मात्र, यात कोणतीही जिवीत हानी झाली नाही.  घटना गुरुवारी पहाटे साडेचारच्या सुमारास गुरुनानक चौक ते अशोक चौकाकडे जाणार्‍या नव्या एसटी स्थानकाजवळ घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, कलंगुड येथून छत्तीसगड येथे 23 टन तुरीची डाघेऊन निघालेला ट्रक (एमएच26 बीई1337) पहाटे विजापूर रोड मार्गे सोलापूर शहरात आला. गुरुनानक चौकातून अशोक चौक मार्गे तो तुळजापूर रस्त्याकडे निघाला होता. मात्र अशोक चौक येथील नव्या एसटीस्थानकाजवळ चौकात आल्यानंतर अचानक रस्त्यावर सुरु झालेल्या दुभाजक अंधार, पाऊस आणि अंधूक हेडलाईटचा प्रकाश यामुळे दिसला नाही. त्यामुळे ट्रकच्या दोन्ही चाकांच्यामध्ये दुभाजक आला आणि सुमारे 50 मिटर ट्रक दुभाजक घडत पुढे गेला.