Thu, Apr 18, 2019 16:05होमपेज › Solapur › पंढरपूर शहरातील वाहतूक समस्या प्राधान्याने सोडवण्याची ग्राहक पंचायतीची मागणी

पंढरपूर शहरातील वाहतूक समस्या प्राधान्याने सोडवण्याची ग्राहक पंचायतीची मागणी

Published On: Jan 23 2018 1:11AM | Last Updated: Jan 22 2018 10:25PMपंढरपूर: प्रतिनिधी

शहरातील शिवाजी चौक, गोपाळकृष्ण मंदिर भोवतालचा परिसर, गजानन महाराज मंदिरासमोरील भाग, म.फुले चौक, नगरपालिकेसमोरील तीनही रस्ते, स्टेशन रोड, सावरकर चौक, बस स्थानकासमोरील रस्ता,  नाथ चौक इ. भागामध्ये वाहतुकीची प्रचंड कोंडी होत आहे. ती कोंडी सोडवण्यासाठी नगरपालिका व शहर वाहतूक विभाग यांच्यामध्ये समन्वय असणे गरजेचे आहे असे  प्रतिपादन  अ.भा.ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष शशिकांत हरिदास यांनी केले आहे.

यासंदर्भात दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात हरिदास म्हणाले की, शहरात सध्या सर्वात महत्वाचा व जास्त वाहतूक  असलेल्या सावरकर चौकातील अनेक वर्षापासून बंद असलेले वाहतूक नियंत्रण दिवे नगरपालिकेने  तत्काळ सुरू करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी प्रथम प्राधान्य देणे गरजेचे आहे.  

शहरात अनेक ठिकाणी बिनधास्त थांबणार्‍या रिक्षा, टांगे, हातगाडीवाले, वाहनधारक चौफाळ्यात सकाळी थांबणारे मजूर यांना हटविणेसाठी वाहतूक पोलिस विभागाने सतर्क असले पाहिजे. वाहतूक कोंडी सोडविणेसाठी नगरपालिकेकडून   अतिक्रमण हटविणे ही अत्यंत गरजेचे आहे.दोन्ही विभागाने  यासाठी प्रथम प्राधान्य देवून नागरिकांना  व भाविकांना वाहतूक कोंडीतून मुक्‍त करावे व मोकळा श्‍वास घेता यावा  अशी  अपेक्षा अ.भा. ग्राहक पंचायतीचे  जिल्हा संघटक शशिकांत हरिदास, व जिल्हा अध्यक्ष भरते यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात व्यक्‍त केली आहे .