Sat, Nov 17, 2018 08:41होमपेज › Solapur › सोलापूर : ट्रॅक्टर पलटी होऊन दोघांचा जागीच मृत्यू

सोलापूर : ट्रॅक्टर पलटी होऊन दोघांचा जागीच मृत्यू

Published On: Sep 12 2018 7:28PM | Last Updated: Sep 12 2018 7:28PMवैराग : प्रतिनिधी

माढा तालुक्यातील हळदुगे व लाडोळे गावच्या शिवेवर ट्रॅक्‍टर अपघातात दोघेजण जागीच ठार झाले. बुधवारी दुपारी २.३० वा.च्या सुमारास ट्रॅक्‍टरवरील नियंत्रण सुटल्याने पलटी झाला. यात बाबुराव अभिमान गायकवाड (वय ५५, रा. हळदुगे) आणि अनिल काशिनाथ बुरगुटे (वय ५२, उपळे दु) या दोघांचा मृत्यू झाला. 

याबाबत वैराग पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, उपळे (दु) येथे सपाटीकरणाचे काम करून ट्रॅक्‍टर (एम.एच. २५ एच ७९३६) वैरागकडे निघाला होता. दरम्यान चालक अनिल बुरगुटे यांचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्‍टर रस्‍त्याखाली जाऊन पलटी झाला. 

अपघात एवढा भीषण होता की यात चालक बुरगुटे हे स्‍टेअरिंगमध्येच अडकले. त्यांना त्याठिकाणाहून बाहेर पडता आले नाही. तर शेजारी बसलेले बाबुराव गायकवाड हे ट्रॅक्‍टरखाली अडकल्याने जागीच मृत्युमुखी पडले. अपघातात ट्रॅक्‍टरचे ५० हजारांचे नुकसान झाले आहे. 

मृत दोघांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन वैराग येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात केले. याबाबत मृत वैराग पोलिसांत गुन्‍हा नोंद करण्यात आला आहे. 

तर वाचला असता जीव

अपघातानंतर चालक अनिल बुरगुटे हे स्‍टेअरिंगमध्ये अडकले होते. तेव्‍हा ते जिवंत होते परंतु अंगावर ओझे असल्याने आणि वेळेत बाहेर काढता आले नाही. त्यामुळे केवळ बचाव यंत्रणेअभावी बुरगुटे यांचा मृत्यू झाला.