होमपेज › Solapur › सोलापूर : वीज पडून महिला ठार;  दोन जखमी

सोलापूर : वीज पडून महिला ठार;  दोन जखमी

Published On: Apr 08 2018 7:43PM | Last Updated: Apr 08 2018 7:43PMकरमाळा : प्रतिनिधी

चिखलठाण (ता. करमाळा) येथे कोटलिंग देवाच्या यात्रेसाठी आलेल्या महिला भाविकाचा वीज पडून जागीच मृत्यू झाला. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

लसाबाई मनिलाल ठाकरे (वय २५, रा. रा.कळवण जि. नाशिक) असे मृत झालेल्या महिला भाविकाचे नाव आहे. तर मनीलाल साधू ठाकरे (वय ३०),  सरला विनोद मोरे (वय २२ ) असे जखमींची नावे आहेत. ही घटना शनिवारी रात्री चिखलठाण येथील कोटलिंग मंदिराजवळ घडली आहे. या घटनेची खबर चिखलठाणचे पोलिस पाटील मारूती मुरलीधर गायकवाड यांनी करमाळा पोलिसात दिली आहे.
या घटनेतील मृत भाविक महिला ही आपल्या पती व बहिण मेव्हण्यासह कळवण तालुका व जिल्हा नाशिक येथून चिखलठाण येथील कोटलिंग यात्रेस आल्या होत्या.

रविवारी यात्रा आसल्याने शनिवारी देवदर्शन घेण्यासाठी कोटलिंग मदिंर परिसरात आली होती. यावेळी अचानक  झालेल्या विजेच्या गडगडाटासह अवकाळी पावसामुळे हे भाविक सागाच्या झाडाच्या आडोशाला थाबंले होते. यावेळी वीज महिलेच्या अंगावर पडल्याने त्या जागीच ठार झाल्या. तर त्यांच्या कुटुंबातील दोघेजण जखमी झाले आहेत. यामध्ये पती मनिलाला ठाकरे व जखमींना उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले.