होमपेज › Solapur › मोहोळ बसस्थानकात चोरी करणाऱ्या तीन महिलांना रंगेहात पकडले

मोहोळ बसस्थानकात चोरी करणाऱ्या तीन महिलांना रंगेहात पकडले

Published On: Aug 06 2018 5:53PM | Last Updated: Aug 06 2018 5:53PMमोहोळ : वार्ताहर

गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांचे पैसे आणि दागिने चोरणाऱ्या तीन संशयीत माहिलांना मोहोळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आज (दि. ६ ऑगस्‍ट ) दुपारी साडेचार वाजता पोलिसांनी त्यांना मोहोळ बसस्थानकात चोरी करण्याच्या तयारीत असताना रंगेहात पकडले. 

याबाबत सविस्तर वृत्त असे की, गेल्या वर्षभरापासून  मोहोळ बसस्थानकात प्रवाशांचे पैसे, मौल्यवान वस्तू, दागिने चोरीला जाण्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, चोरी करणारे चोरटे मिळून येत नव्हते. त्यामुळे बसस्थानक प्रशासनाने या परिसरात क्लोज सर्कीट कॅमेरे बसवले आहेत. शिवाय मोहोळ पोलिसांचे एक पथक साध्या वेषात या परिसरात पाळत ठेवून असतात.

बसस्थानक परिसरात आज तीन महिला संशयास्पदरित्या फिसत होत्या. त्या माहिला मोहोळ सौंदणे बसमध्ये चढून एका वृद्ध महिलेच्या जवळ बसण्याचा आग्रह करत होत्या. काही वेळाने वृद्ध महिलेस त्यांच्या पर्सची चैन उघडी दिसल्याने संशय आला. तोपर्यंत या महिला चोरी करुन बस मधून उतरु लागल्या. मात्र, या वृद्ध महिलेच्या सावधानतेमुळे अन्य प्रवाशांनी त्यांना पकडले. यावेळी या माहिलांनी चोरलेली पैशाची पर्स परत दिली.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्‍थळी धाव घेत चोरी करणाऱ्या तिन्ही महिलांना ताब्यात घेतले. महिला पोलिसांनी त्यांची झाडा झडती घेतली असता, त्यांच्याकडे सोन्याचे दागिने व काही रक्कम तसेच त्‍या वृद्ध महिलेचे सोन्याचे दागिने देखील आढळून आले.

या तिन्ही महिलांच्या नावांबाबत पोलिसांकडून गोपनीयता बाळगली असून, त्यांची कसून चौकशी सुरु आहे. अशी माहिती पोलिस सुत्रांकडून मिळाली आहे.