Tue, Jul 16, 2019 01:46होमपेज › Solapur › सोलापूर : सेवानिवृत्त पोलिसाचे घर फोडले

सोलापूर : सेवानिवृत्त पोलिसाचे घर फोडले

Published On: Jan 18 2018 7:52PM | Last Updated: Jan 18 2018 7:52PMसोलापूर : प्रतिनिधी

बाळे येथील राजेश्‍वरीनगरातील सेवानिवृत्त पोलिस कर्मचार्‍याचे  बंद  घर  दिवसाढवळ्या  फोडून चोरट्याने ३ लाख १७  हजार  रुपयांचे १६ तोळ्याचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरुन नेली. ही घरफोडीची घटना बुधवारी रात्री उघडकीस आली असून, गेल्या काही दिवसांमध्ये शहर हद्दीमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे.

घरफोडीच्या  या घटनेबाबत बजरंग श्रीरंग कदम (वय 62, रा. ब्लॉक नं. 8, राजेश्‍वरीनगर, बाळे, सोलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
बजरंग कदम हे दोन वर्षांपूर्वी पोलिस खात्यातून सेवानिवृत्त झाले आहेत. बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास कदम हे त्यांच्या पत्नीसह घराला कुलूप लावून त्यांची नात आजारी असल्याने तिला पाहण्यासाठी सलगर वस्ती येथील मुलीच्या घरी गेले होते. कदम हे रात्री साडेनऊच्या सुमारास परत घरी आले. घराचा दरवाजा उघडून कदम आतमध्ये गेले असता बेडरूममध्ये बेडवर दागिने ठेवलेली बॅग पडलेली दिसून आली. त्यामुळे कमद यांना घरामध्ये चोरी झाल्याचा संशय आल्याने त्यांनी याबाबत फौजदार चावडी पोलिसांना माहिती दिली असून, वरिष्ठ अधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली.  अधिक तपास पोलिस निरीक्षक संजय जगताप करीत आहेत.