Fri, Apr 26, 2019 10:08होमपेज › Solapur › घरफोड्यांना अटक; चार लाखांचा मुद्देमाल जप्त

घरफोड्यांना अटक; चार लाखांचा मुद्देमाल जप्त

Published On: Feb 15 2018 1:58AM | Last Updated: Feb 14 2018 9:01PMसोलापूर : प्रतिनिधी

शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तिघा घरफोड्यांना अटक करुन त्यांच्याकडून 180 ग्रॅम  सोन्याचे, सुमारे 16 तोळे चांदीचे दागिने आणि मोटारसायकल असा 3 लाख 77 हजार रुपये किंमतींचा मुद्देमाल जप्त केला. अटक केलेल्या आरोपींकडून घरफोडीचे 7 गुन्हे तर चोरीचा एक गुन्हा उघडकीस आला आहे.

अनंत दौला चव्हाण (वय 32), गणेश उर्फ दाद्या इंद्रजित काळे (वय 24, रा. पारधी कॅम्प, कुंभारी, ता. दक्षिण सोलापूर) आणि पर्‍या उर्फ दादा जगू भोसले (वय 33, रा. वंजारवाडी, मारूती मंदिराशेजारी, ता. करमाळा, जि. सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

अनंत चव्हाण व गणेश काळे या दोघांनी मिळून मागील आठवड्यात विजापूर नाका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील  बॉम्बे पार्क, ए. जी. पाटील नगर, सिध्देश्‍वर पार्क, आर्य चाणक्य नगर येथे तसेच सदर बझार पोलिस ठाण्याच्या हद्दीतील लाल बहादूर शाळेजवळील घरामध्ये घरफोडी केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी सर्व घरफोडीमधील 3 लाख 7 हजार 820 रुपयांचा  मुद्देमाल जप्त केला आहे. 

तसेच  पर्‍या  भोसले याने जेलरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी आणि जोडभावी पेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत तीन घरफोड्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच्याकडून एक दुचाकी व 22 ग्रॅमचे सोने असा 70 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कामगिरी पोलिस आयुक्‍त महादेव तांबडे, पोलिस उपायुक्‍त पौर्णिमा चौगुले, सहायक पोलिस आयुक्‍त शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, पोलिस निरीक्षक सूर्यकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक रणजित माने, वैभव माळी, पोलिस हवालदार नंदराम गायकवाड,  पोलिस नाईक दीपक राऊत, विनायक बर्डे, सचिन होटकर, सागर सरतापे, सुहास अर्जुन, कपिल पिरजादे, राजू राठोड, राहुल गायकवाड, शंकर मुळे, राजेश चव्हाण, नाना उबाळे, शितल शिवशरण, मंजुनाथ मुत्तनवार, पोलिस शिपाई सचिन बाबर, सागर गुंड, दत्तात्रयक काळेकर, काकडे, विजय निंबाळकर यांनी केली.