Sat, Jul 20, 2019 10:40होमपेज › Solapur › हजारहून अधिक बालकांचा टेस्ट ट्यूब बेबी तंत्राद्वारे जन्म

हजारहून अधिक बालकांचा टेस्ट ट्यूब बेबी तंत्राद्वारे जन्म

Published On: Jan 28 2018 1:32AM | Last Updated: Jan 27 2018 11:25PMसोलापूर ः प्रतिनिधी

शोभा नर्सिंग होममध्ये एक हजारहून अधिक बालकांचा टेस्ट ट्यूब बेबी तंत्रज्ञानाव्दारे जन्म झाला आहे. ही पालकांना सुखावणारी कामगिरी शोभा नर्सिंग होमकडून केली जात आहे. ज्यामध्ये हे हॉस्पिटल सातत्याने इंडो जर्मन केंद्रामध्ये प्रथम क्रमांकावर असल्याचे संचालक डॉ. मिलिंद पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

शोभा नर्सिंग होम प्रा. लि. इंडो जर्मन टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, पोस्ट ग्रॅज्युएट  इन्स्टिट्यूट, सोलापूर या उपचार केंद्रास स्थापन होऊन सहा वर्षे पूर्ण झाली आहे. त्यानिमित्ताने शोभा नर्सिंग होम, सरस्वती चौक येथे 25 जानेवारी रोजी सकाळी साडेअकरा वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. 

पुढे डॉ. पाटील म्हणाले, 6 वर्षे 6 महिन्यांमध्ये 1 हजारहून अधिक टेस्ट ट्यूब बेबी तंत्रज्ञानाव्दारे आणि पाचशेच्यावर बालकांचा जन्म इतर वंध्यत्व निवारण पध्दतीने झालेला आहे. 

या यशस्वी कामगिरीमुळे अपत्ये होत नसलेली जोडपी अमेरिका, जर्मनी, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, इस्त्राईल, दुबई असे परदेशातून आणि आखाती देशातून सोलापुरात शोभा नर्सिंग होममध्ये उपचारासाठी दाखल होत आहेत. 

यामध्ये ज्या महिलांमध्ये अनेकवेळा टेस्ट ट्यूब बेबीच्या उपचार पध्दतीमुळे यश येत नाही. अशा महिलांच्या गर्भाच्या आवरणाला लेसर तंत्रज्ञानाने छेद देऊन त्यांची यशाची पातळी वाढवता येते. त्यामुळे येथे चांगल्या व प्रभावी उपचारामुळे पालकांधून समाधान व्यक्त केले जात आहे.

या पत्रकार परिषदेस डॉ. शैलेश पाटील, डॉ. प्रतिभा पाटील, डॉ. मनिषा पाटील, डॉ. अनिल हुलसूरकर, डॉ. गायत्री आपटे आदी उपस्थित होते.