होमपेज › Solapur › टेंभूर्णीत टायर शोरूम फोडून तीन लाखाचा माल लंपास 

टेंभूर्णीत टायर शोरूम फोडून तीन लाखाचा माल लंपास 

Published On: Jan 07 2018 10:47PM | Last Updated: Jan 07 2018 10:47PM

बुकमार्क करा




टेभुर्णी : प्रतिनिधी

येथील पुणे-सोलापूर महामार्गावरील बालाजी ट्रेंडर्स या टायर शोरूमचे शटर उचकटून अज्ञात चोरट्याने रोख रक्कमेसह ३ लाख ८१ हजार रुपयांचा माल लंपास केल्याची घटना घडली. ही घटना रविवार सकाळी उघडकीस आली. या घटनेने व्यापारी वर्गात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना शनिवारी रात्री ते रविवारी पहाटे दरम्यान घडली असून सकाळी ८ वा. उघडकीस आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बालाजी ट्रेंडर्स हे  एमआरएफ कंपनीच्या टायरचे शोरूम असून अज्ञात चोरट्यानी शोरूमचे शटर उचकटून शोरूममधील १५ हजार रुपये रोख रक्कम, सोनी कंपनीचा लॅपटॉप किंमत २५ हजार रुपये, सीसीटीव्हीचा एलसीडी व डीव्हीआर किंमत २२ हजार रुपये, असा एकूण ६२ हजार रुपयाचा ऐवज. तसेच एमआरएफ कंपनीचे वेगवेळ्या साईजचे २२४ टायर किंमत ३ लाख १९ हजार ७०० रुपये चोरीस असा एकूण ३ लाख ८१ रुपयाचा माल चोरीस गेला आहे.

शनिवारी रात्री नेहमी प्रमाणे शोरूम बंद करून घरी गेल्यानंतर शनिवारी रात्री ते रविवारी सकाळी या  कालावधीत   ही घटना घडली आहे.  

शोरूमचे मालक दीपक दिलीप पाटील हे असून शोरूमचा मॅनेंजर संदीप अशोक ढेरे (वय-२९, रा. नगोर्ली, ता.माढा) हे रविवारी सकाळी शोरूम उघडण्यासाठी गेले असता चोरी झाल्याचे उघडकीस आले. याची फिर्याद संदीप ढेरे यांनी दिली असून सायंकाळी उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेने व्यापारी वर्गातून खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वीही झालेल्या एकाही चोऱ्यांचा तपास लागलेला नाही. त्यामुळे चोरट्याचे धाडस वाढतच चालले आहे. अधिक तपास पो. उपनिरीक्षक पी. के. मस्के करत आहेत.