होमपेज › Solapur › बिग बी, खासदारकीची पेन्शन उदरनिर्वाहासाठी द्या; शिक्षकाची मागणी

‘बिग बी, खासदारकीची पेन्शन उदरनिर्वाहासाठी द्या’

Published On: May 15 2018 10:52PM | Last Updated: May 16 2018 11:20AMसोलापूर : प्रतिनिधी 

शासनाने महाविद्यालय बेकायदेशीरपणे बंद केल्यामुळे उपासमारीची वेळ आलेल्या  शिक्षकाने चक्‍क माजी खासदार व स्वच्छ भारत मिशनचे ब्रॅन्ड अ‍ॅम्बेसिडर अमिताभ बच्चन यांची खासदारकीची पेन्शन आपल्या उदरनिर्वाहासाठी मिळावी, अशी मागणी केली आहे.

राजू प्याटी हे सलगर ब्रु. ता. मंगळवेढा येथील शारीरिक शिक्षण महाविद्यालय येथे शिक्षक होते. मात्र शासनाने या महाविद्यालयाची मान्यता रद्द केली आहे. शासनदरबारी  पाठपुराव्यासाठी आणखी काही दिवस लागणार आहेत. त्यामुळे अमिताभ बच्चन यांनी त्यांना मिळणारी खासदार पेन्शन आपल्याला द्यावी, अशी मागणी केली आहे. तसेच आपल्या नोकरीचा प्रश्‍न सुटल्यानंतर आपण घेतलेले संपूर्ण पैसे परत करू, अशा आशयाचे प्रतिज्ञापत्रही त्यांनी करून  दिले आहे. त्यामुळे अमिताभ बच्चन यांना आता त्यांनी चांगलेच साकडे घातले आहे. त्यामुळे या प्रस्तावाला बच्चन आता काय उत्तर देणार, याकडे त्यांचे लक्ष लागून राहिले आहे.