Thu, Jun 27, 2019 00:21होमपेज › Solapur › मला भावलेले व्होळकर सर : संभाजी वाघुले शेळवे 

मला भावलेले व्होळकर सर : संभाजी वाघुले शेळवे 

Published On: Sep 05 2018 10:53AM | Last Updated: Sep 05 2018 10:53AMमला भावलेले सर म्हणजे व्होळकर सर, ते मुळचे व्होळे ता.पंढरपुर येथील होते. त्यांचे नाव शामराव ज्ञानोबा व्होळकर असे होते. सर सायन्स विषय शिकवत असत. सर, शांत संयमी आणि मितभाषी होते. सर स्वच्छ विचाराचे होते. सर वर्गात आले की म्हणायचे चला काल दिलेला अभ्यास कुणी कुणी पुर्ण केला. मुले फक्त हो सर मी पुर्ण केलाय म्हणायचे मग सर शिकवायला सुरूवात करायचे.
व्होळकर सर कायम शांत असत. कधीही अभ्यासा व्यतिरिक्त सर जादा बोललेले मी पाहीले नाही. सरांनी कधीच कुणालाच शिक्षा केलेली मला तर आठवत नाही. कधी कुणाची मजा मस्करी केलेली सुद्धा मी पाहीलेली नाही. शाळेत सुद्धा कधी इकडचा शब्द तिकडे नाही कि तिकडचा शब्द इकडे नाही. आज सरांच्या संस्काराने, विचारानेच आम्ही घडलेलो आहोत. मी शाळेतून 10 वी नंतर बाहेर पडलो तसा मी माझ्या कामात गुंतलो. आज कित्येक त्यांचे विद्यार्थी सरांच्याच विचारांवर समाजात ताट मानेने जगत आहेत. अचानक एके दिवशी सरांनी जगाचा निरोप घेतल्याच कळल. फार दू:ख वाटल णि पुन्हा एकदा विचाराने व्होळकर सरांच्या तासाला बसलो.
- संभाजी वाघुले शेळवे ता.पंढरपुर