Sun, Aug 25, 2019 08:09होमपेज › Solapur › तपकिरी शेटफळ येथे बालिकेचा बुडून मृत्यू

तपकिरी शेटफळ येथे बालिकेचा बुडून मृत्यू

Published On: Apr 15 2018 1:26AM | Last Updated: Apr 15 2018 1:26AMपंढरपूर : प्रतिनिधी 
 

धुणे धुण्याकरिता माण नदीवर गेल्यानंतर बंधार्‍यातील पाण्यात बुडून एका 7 वर्षीय बालिकेचा मृत्यू झाला तर दोन मुलींचा जीव एका महिलेच्या प्रसंगावधानामुळे बचावला आहे. ही दुर्घटना शनिवार (दि. 14 एप्रिल) रोजी घडली असून, निकीता वसंत कांबळे (वय 7, तपकिरी शेटफळ, ता. पंढरपूर ) असे मयत मुलीचे नाव आहे

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, तपकीरी शेटफळ येथील माण नदीवर असलेल्या बंधार्‍यावर धुणे धुण्याकरिता निकीता वसंत कांबळे, प्रगती भारत कांबळे आणि रोहिणी वसंत कांबळे या तीन मुली  शनिवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास गेल्या होत्या. त्यावेळी धुणे धूवून झाल्यानंतर या मुली पोहण्याकरिता बंधार्‍याच्या पाण्यात उतरल्या. मात्र त्याठिकाणी पाणी खोल असल्यामुळे त्या बुडू लागल्या.
 
दरम्यान त्याठिकाणी असलेल्या सुशीलाबाई माने यांनी प्रसंगावधान राखून दोन मुलींना पाण्याबाहेर काढले परंतू निकीताला वाचवण्यात अपयश आले. ही दुर्घटना समजताच तपकीरी शेटफळ परिसरात हळहळ व्यक्त होत असून प्रसंगावधान राखून दोन मुलींचा जीव वाचवल्याबद्दल सुशिलाबाई माने यांच्या धाडसाचे मात्र कौतूक होत आहे. 

Tags : tapakiri shetaphal girls ,death, drawn ,solapur news