Sat, Nov 17, 2018 04:06होमपेज › Solapur › तलाठी मारहाण; 22 पासून कामबंदचा इशारा

तलाठी मारहाण; 22 पासून कामबंदचा इशारा

Published On: Mar 19 2018 1:49AM | Last Updated: Mar 18 2018 10:12PMटेंभुर्णी : प्रतिनिधी 

तलाठी मारहाण प्रकरणाची तलाठी संघटनेसह सर्व महसुली संघटनेने गंभीर दखल घेतली असून मारहाण करणार्‍यांना 19 पर्यंत अटक न केल्यास सोमवारपासून  माढा तालुक्यात कामबंद आंदोलन करण्याचा इशारा माढा तालुका तलाठी संघटनेने दिला असून 22 मार्चपासून संपूर्ण जिल्हाभर कामबंद आंदोलन करण्याचा इशारा दिला  आहे. याबाबत तलाठी संघटना, राज्य ग्रामसेवक संघ, महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन, महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटना, आरोग्य सेवक संघटना आदी संघटनाच्या पदाधिकार्‍यांची बैठक पार पडली. यात हा निर्णय घेण्यात  आला. 

यावेळी जिल्हाध्यक्ष राजकुमार पांडेकर, राज्य ग्रामसेवक संघाचे जिल्हाध्यक्ष तात्यासाहेब पाटील, उपाध्यक्ष कैलास सुरवसे, महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनचे तालुकाध्यक्ष औदुंबर शिंदे, महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष संजय पाटील, तालुकाध्यक्ष ए.टी. देशमुख, सचिव अनिल कांबळे, शिक्षक संघटनेचे वरकुटे, तलाठी संघाचे तालुकाध्यक्ष के. जी. दळवे, संघटनेचे कार्याध्यक्ष प्रशांत जाधव, एम.एस. मडीखांबे, जी.वाय. ढोकणे, एस.बी.पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित  होते.