होमपेज › Solapur › सोलापूर : मंगळवेढा तलवार हल्ल्यातील एकाच मृत्यू

सोलापूर : मंगळवेढा तलवार हल्ल्यातील एकाच मृत्यू

Published On: Apr 25 2018 9:23PM | Last Updated: Apr 25 2018 9:23PMमंगळवेढा : प्रतिनिधी

महिन्यांपूर्वी दोन गटात झालेल्या मारहाणीचा राग मनात धरत बुधवारी रात्री आठच्या सुमारास शहरातील मुरलीधर चौकात झालेल्या तलवार हल्ल्यात सचिन ज्ञानेश्वर कलुबरमे (वय 25) या युवकाचा सोलापुरात उपचारादरम्यान म्रुत्यु झाला प्रदीप हरी पडवळे (वय 22) हा गंभीर जखमी झाला आहे.

बुधवारी सायंकाळी आठच्या सुमारास सचिन आणि प्रदीप हे दोघे तरूण  मुरलीधर चौकात थांबले असता अचानक गावातीलच एका युवकाच्या गटाने दोघांवर तलवार हलँला केला. यात सचिनच्या मानेवर तलवारीचे वर्मी घाव बसला. त्यामुळे तो रक्तबंबाळ अवस्थेत पडला. तर प्रदीपच्या हातावर तसेच पाठीलरही तलवारीचे वार झाले.

दोघेही रक्तबंबाळ अवस्थेत पडल्याचे दिसताच हल्लेखोरांनी तिथून पलायन केले. याचवेळी चौकातील इतर नागरिकांनी तातडीने दोघांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले परंतु सचिनची तब्येत बिघडत चालल्याचे पाहून डाँक्टरांनी त्यास सोलापूरला हलविले. परंतू सोलापुरात उपचारादरम्यानच त्याचा म्रुत्यु झाल्याचे सांगण्यात आले.

घटनेनंतर मंगळवेढ्यात तणावाचे वातावरण असून वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Tags : solapur, solapur news, swart attack, mangalwedha