होमपेज › Solapur › अवैध वाळू  वाहतूक करताना पकडलेला टिपर पोलिसाचा?

अवैध वाळू  वाहतूक करताना पकडलेला टिपर पोलिसाचा?

Published On: Jan 22 2018 1:22AM | Last Updated: Jan 21 2018 9:58PMमंगळवेढा : तालुका प्रतिनिधी 

 तहसीलदार यांनी बेकायदा वाळूचा टिपर पकडून एसटी आगारात लावला होता. दरम्यान हा टिपर चालकाने पळवून नेल्याचा गुन्हा पोलिसात दाखल होवून बारा दिवसाचा कालावधी लोटला. अद्यापही पोलिसांना टिपरचा चालक व टिपर न सापडल्यामुळे तपास प्रक्रियेवर साशंकता व्यक्त होत असून हा टिपर एका पोलिसाचाच असल्याची चर्चा सुरू आहे. पोलीस अधिक्षक विरेश प्रभू यांनी लक्ष घालून वाळू व्यवसाय करणार्‍या पोलीसावर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

दि.11 रोजी सकाळी 9 वा. शहराजवळ तहसीलदार गणेश लव्हे यांनी भीमा नदी पात्रातून बेकायदा वाळू घेवून आलेला (एम.एच-13.ए.एक्स-4990) हा टिपर पकडून सुरक्षिततेच्या कारणास्तव मंगळवेढा एसटी आगारात लावला होता. दि.12 च्या पहाटे 2 वा.सदर टिपर चालकाने एसटी आगारातून तो टिपर पळवून नेला. 

याप्रकरणी टिपर चालकाविरूद्ध टिपर पळविल्याचा गुन्हाही दाखल झाला आहे. मात्र चालक व टिपरचा तपास पोलिसांना अद्यापही लागला नाही. हा टिपर एका पोलिस कर्मचार्‍याचा असल्याची चर्चा असून गेली वर्षभर बेकायदा वाळू उपशाचे काम सुरू आहे. आत्तापर्यंत कुठल्याही पोलीस पथकाने त्यांच्यावर कारवाई न केल्यामुळे तो बिनधास्तपणे वाळूचा व्यवसाय करीत होता. असे बोलले जाते. दरम्यान( ए.एक्स-4989) या क्रमांकाच्या टिपरचा मालक नेमका कोण आहे? हे आपल्या विभागाकडे उपलब्ध असलेल्या कागदपत्रावरून प्रस्तुत वाहनाची चौकशी करून वाहन कोणाच्या नावावर आहे.