Tue, Jul 16, 2019 11:59होमपेज › Solapur › सुशीलकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज उपोषण

सुशीलकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज उपोषण

Published On: Apr 08 2018 10:19PM | Last Updated: Apr 08 2018 9:34PMसोलापूर : प्रतिनिधी

देशातील व राज्यातील सामाजिक सलोखा व शांततेला जाणूनबुजून धोका निर्माण झालेला आहे. यासाठी भाजप सरकारच्या विरोधात सोमवार, 9 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता चार हुतात्मा पुतळा सोलापूर येथे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाचे उपोषण होणार आहे. 

भाजप सरकार केंद्रात व राज्यात सत्तेवर आल्यापासून त्यांच्या चुकीच्या व द्वेषपूर्ण भूमिकेमुळे देशातील शांतता व सामाजिक सलोखा नष्ट झालेला आहे. 2 एप्रिल  रोजी विविध संघटनेच्या माध्यमातून भारत बंदचे आयोजन करण्यात आले होते, मात्र त्यादिवशी भाजप शासनाच्या नाकर्तेपणामुळे अनेक ठिकाणी दुर्दैवी घटना घडल्या व हिंसाचारी घटना घडल्या व हिंसाचार उफाळून आला आणि त्यामुळे अनेक निष्पाप जीव बळी पडले. त्याचप्रमाणे देशभरात विविध राज्यात जाणिवपूर्वक सामाजिक तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. महाराष्ट्रातही भीमा-कोरेगाव येथे मराठा व दलित समाजामध्ये जाणिवपूर्वक संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला आहे, हे स्पष्ट आहे.

या उपोषणास आ. प्रणिती शिंदे, आ. सिद्धाराम म्हेत्रे, आ. भारत नाना भालके, आ. रामहरी रुपनवर, सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश पाटील, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश वाले, माजी आमदार निर्मलाताई ठोकळ, माजी आमदार दिलीप माने, माजी आमदार विश्‍वनाथ चाकोते, माजी आमदार जयवंतराव जगताप, प्रदेश काँग्रेस सरचिटणीस प्रकाश यलगुलवार, धर्मा भोसले, अलका राठोड, माजी खासदार धर्मण्णा सादूल, माजी महापौर सुशीला आबुटे, नलिनी चंदेले, संजय हेमगड्डी, यु.एन. बेरिया, पक्षनेते चेतन नरोटे यांच्या उपस्थितीत उपोषण होणार आहे.
तरी काँग्रेस पक्षाचे शहरातील व जिल्ह्यातील आजी/माजी पदाधिकारी, ब्लॉक, फ्रंटल, सेलचे अध्यक्ष व पदाधिकारी महापालिकेचे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरपालिकेचे नगरसेवक, परिवहन समिती सदस्य व काँग्रेस कार्यकर्त्यांनी सदर उपोषणास वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सातलिंग शटगार यांनी केले आहे.