Tue, Mar 19, 2019 20:59होमपेज › Solapur › पिलीवच्या सुमित्रा दूध संस्थेच्या जागा विक्रीप्रकरणी चौकशीचे आदेश

पिलीवच्या सुमित्रा दूध संस्थेच्या जागा विक्रीप्रकरणी चौकशीचे आदेश

Published On: Jan 17 2018 2:05AM | Last Updated: Jan 16 2018 9:13PM

बुकमार्क करा
पिलीव : वार्ताहर

 पिलीव येथील सुमित्रा सहकारी दूध उत्पादक संस्थेच्या मालकीची सातारा -पंढरपूर रज्य महामार्गा लगतची संपूर्ण जागा इमारतीसह संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सचिव या तिघांनी संगनमत करून सभासदांच्या परस्पर बनावट कागदपत्रे तयार करून जागेची विक्री केली असल्याची तक्रार करून या व्यवहाराची कायदेशीर चौकशी करण्याची मागणी तत्कालीन संचालक नारायण सुळे, सभासद श्रीकांत नष्टे , हरीसिंग भैस, जिल्हा दुग्ध व्यवसाय विकासाधिकारी, जिल्हाधिकारी व ग्रामीण पोलिस अधिक्षक सोलापूर यांच्याकडे तक्रारी केली होती.

 या तक्रारीची दखल घेतली नसल्यामुळे जिल्हा दुग्ध व्यवसाय विकासाधिकारी सोलापूर यांच्या कार्यालयापुढे वरील तक्रारदारांनी दि.29 जानेवारी रोजी उपोषणाचा इशारा दिला आहे. याची तातडीने दखल घेत सदर संस्थेच्या जमीन विक्री व इतर कारभाराची रितसर चौकशी व तपासणी करण्याचे आदेश बी एम.सरवदे जिल्हा विशेष लेखापरिक्षक वर्ग 2 सहकारी संस्था (पदुम) सोलापूर यांना सहायक निबंधक सहकारी संस्था (दुग्ध)सोलापूर यांनी त्यांच्याकडील जावक क्र.63/2017 दि.5/1/2018 च्या पत्रानुसार तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या सदर प्रकरणाच्या चौकशीसाठी हरिसिंग भैस, नारायण सुळे, दत्तात्रय भैस, श्रीकांत नष्टे आदींनी जिल्हा दुग्ध व्यवसाय विकासाधिकारी सोलापूर व संबंधित खाते प्रमुखांकडे तक्रारी अर्ज दाखल केले आहेत.