Fri, Jul 19, 2019 05:18होमपेज › Solapur › सुलेरजवळगे येथे उपसरपंचांनी तालीम पाडली 

सुलेरजवळगे येथे उपसरपंचांनी तालीम पाडली 

Published On: Apr 08 2018 10:19PM | Last Updated: Apr 08 2018 9:22PMसोलापूर : प्रतिनिधी

अक्‍कलकोट तालुक्यातील सुलेरजवळगे येथील उपसरपंच बसवराज बाके यांनी कोणतीही  परवानगी न घेता गावातील व्यायामशाळा (तालीम) बेकायदा पाडली असल्याचा आरोप करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांच्याकडे करण्यात आली आहे. 

ग्रामपंचायतीच्या जागेत व्यायामशाळा आहे. असे असतानाही ग्रामपंचायतीची परवानगी न घेता उपसरपंचानी ही तालीम पाडून येथील दगड व माती विक्री केली असल्याची तक्रार यावेळी करण्यात आली. ग्रामसेविका गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य संतोष माशाळे, धर्मराज बगले व शिलवंत पुजारी आदींनी तालीमची पाहणी केली. 

या प्रकरणी उपसरपंचाकडून पदाचा गैरवापर झाल्याने त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सुलेरजवळगे येथील काही नागरिकांनी डॉ. भारुड यांच्याकडे निवेदन देऊन केली.