Fri, Apr 26, 2019 19:19होमपेज › Solapur › माळशिरसमध्ये आत्‍महत्‍या केलेल्या व्‍यक्‍तीविरोधात गुन्‍हा

माळशिरसमध्ये आत्‍महत्‍या केलेल्या व्‍यक्‍तीविरोधात गुन्‍हा

Published On: Dec 13 2017 2:00AM | Last Updated: Dec 12 2017 10:03PM

बुकमार्क करा

माळशिरस : तालुका प्रतिनिधी

उंबरे वेळापूर (ता. माळशिरस) येथील  कुटुंबिक  वादातून  झालेल्या आत्महत्या घटनेतील मृत पती सुभाष शामराव अनुसे याने पत्नीसह दोन मुलींचा खून करून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना घडल्यानंतर माळशिरस पोलिसांत पती सुभाष अनुसे यांच्या विरोधात पत्नी व दोन मुलींचा खून केल्याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे, तर पती यास खून करुन  आत्महत्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी  गुन्हा दाखला झाला आहे.

मृत सुभाषच्या खिशामध्ये मिळालेल्या चिठ्ठीवरून पोलिसांनी तपास चक्र फिरविली आहेत. त्यानुसार मृतांची पत्नीही सतत माझ्या भावाला पैसे दे असे म्हणून त्रास देत होती. पत्नीचे नातेवाईकसुध्दा सतत पैशासाठी त्रास देत होती. या त्रासाला कंटाळून सुभाष याने पत्नी व मुलीचा खून करुन आत्महत्या केली असल्याचा संशय व्‍यक्‍त केला जात असून त्यानुसार तपास सुरू आहे.