Mon, Jul 15, 2019 23:39होमपेज › Solapur › अहमदपूरात आरक्षणासाठी एकाने केले विष प्राशन

अहमदपूरात आरक्षणासाठी एकाने केले विष प्राशन

Published On: Aug 05 2018 9:38PM | Last Updated: Aug 05 2018 9:39PMअहमदपूर  : प्रतिनिधी 

अहमदपूर तालुक्यातील तीर्थ येथील तुकाराम रामजी पेड (वय ४२) यांनी रविवार ( दि.५) रोजी सायंकाळी ५ : ३० वाजता तहसिलसमोर मराठा आरक्षणासाठी विष प्राशन केल्याची घटना घडली.

तहसील कार्यालयाच्या समोर मराठा आरक्षणाबद्दल चालू असलेल्या ठिय्या आंदोलनाच्या मंडपा शेजारी ऑरगॅनो फॉस्फरस नावाचे विष प्राशण केले. आंदोलन करतेवेळी विषप्राषण केल्याचे लक्षात येताच तातडीने त्यास अहमदपूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. प्रथम उपचार करून पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले.