Fri, Apr 26, 2019 04:12होमपेज › Solapur › उसाला प्रतिटन 2250 दर : अभिजित पाटील

उसाला प्रतिटन 2250 दर : अभिजित पाटील

Published On: Dec 01 2017 11:17PM | Last Updated: Dec 01 2017 10:48PM

बुकमार्क करा

येरमाळा : प्रतिनिधी 

जिल्ह्यातील इतर साखर कारखान्यांच्या तुलनेत 50 रुपये जास्त म्हणजे एकूण प्रतिटन उसाला  2250 रूपये दर देणार असल्याचे धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी शुक्रवार, 1 डिसेंबर रोजी कारखान्यावर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना माहिती दिली. 

सध्या ऊसदरावरून शेतकरी संघटना दर वाढवून मिळावा म्हणून आंदोलन करीत आहेत. धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी मोळी टाकण्याच्या कार्यक्रमात एफआरपीपेक्षा पन्नास रुपये जास्त दर देण्याचे जाहीर केले होते. कारखान्याचे गाळप प्रत्यक्षात नऊ नोव्हेंबरला चालू झाले असून आजपर्यंत कारखान्याने 251 32 मेट्रीक टन उसाचे गाळप झाले आहे म्हणजे आजपर्यंत 20450 साखरेचे पोत्याचे उत्पन्न झाले असल्याचे अभिजित पाटील यांनी सांगितले. पुढे बोलताना त्यांनी आजपर्यंत गाळप झालेल्या उसाची बिले शेतकर्‍यांना ठरल्याप्रमाणे दहा दिवसांच्या आत घरपोच केल्याचेही त्यांनी सांगितले. 

तसेच शेतकर्‍यांच्या उसाला योग्य दर मिळावा, उतारा चांगला मिळावा यासाठी शेतकरी ऊस उत्पादकांनी प्रोग्रामप्रमाणे ऊसतोड येण्याची वाट पाहावी. ऊस परिपक्व होण्यापूर्वी त्यांनी कोणत्याही कारखान्याला ऊस पाठविण्याची गडबड करू नये, यातून शेतकरी व कारखान्याचेही नुकसान होते. धाराशिव साखर कारखाना शब्द दिल्याप्रमाणे काटा न मारता योग्य दर देण्याच्या शब्दाला सदैव कटीबद्ध राहील. 

याचा अनुभव शेतकरी ऊसतोड कामगार वाहतूक करणार्‍या वाहन  धारकांना आला असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले.