Sun, Aug 25, 2019 08:02होमपेज › Solapur › ऊसतोड मजूर, मुकादम संघटनेची संपाची हाक

ऊसतोड मजूर, मुकादम संघटनेची संपाची हाक

Published On: Aug 21 2018 1:41AM | Last Updated: Aug 21 2018 12:13AMबीड : प्रतिनिधी

ऊसतोड मजूर, मुकादम व वाहतुकदारांच्या विविध मागण्या मंजूर होईपर्यंत कोयता हातात घेणार नसल्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. गोपीनाथराव मुंडे ऊसतोडणी मजूर, मुकादम व वाहतुकदार संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी बीडमध्ये पत्रकार परिषद घेऊन ही माहिती  दिली. याच प्रश्‍नावर संघटनांची एकजूट करण्यासाठी 1 सप्टेंबरला बीडमध्ये मेळावाही होणार आहे.

ऊसतोड मजूर, मुकादम, वाहतुकदार आणि साखर संघ यांच्यात एका लवाद नेमलेला आहे. दर तीन वर्षांनी महागाई निर्देशांक लक्षात घेऊन या लवादाच्या बैठकीत ऊसतोड मजूर, मुकादमांचे कमीशन आणि वाहतुकीचा दर वाढवून दिला जातो. यापूर्वी ही बैठक 2015 मध्ये झाली होती. आता त्याला तीन वर्ष पूर्ण झाल्याने  संघटनेकडून दरवाढीची मागणी करण्यात आली आहे. मागण्यांबाबतचे निवेदन मुख्यमंत्री, साखर संघ, सहकार मंत्री,  कामगार मंत्र्यांना पाठवण्यात आले आहे. संपात सहभागी सर्व संघटनांच्या प्रतिनिधींचा आणि ऊसतोड मजुरांचा 1 सप्टेंबर रोजी बीडमध्ये मेळावा होणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. या पत्रकार परिषदेला संघटनेचे मार्गदर्शक केशवराव आंधळे, अध्यक्ष श्रीमंत जायभाये, संजय तिडके, गोरक्ष रसाळ, राणा डोईफ ोडे आदी उपस्थित होते.