Sat, Nov 17, 2018 12:10होमपेज › Solapur › सोलापूर : सहायक फौजदाराकडून ५ लाख लुटले

सोलापूर : सहायक फौजदाराकडून ५ लाख लुटले

Published On: Mar 19 2018 11:59AM | Last Updated: Mar 19 2018 11:59AMसोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर शहर पोलिस दलाच्या अशोक चौकातील पेट्रोल पंपावर जमा झालेली ५ लाख रुपयांची रोकड पोलिस मुख्यालयात देण्यासाठी जाणार्‍या सहायक फौजदाराच्या डोळ्यात चटणी टाकून चाकूने वार करुन सहा जणांच्या टोळीने लुटूली. ही घटना रविवारी रात्री ११ च्या सुमारास पोलिस मुख्यालयासमोरील मार्कडेंय जलतरण तलावाजवळ घडली. यावेळी जखमी सहायक फौजदाराने दरोडेखोरांशी झटापट केली, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. 

याबाबत पेट्रोल पंपावरील इंनचार्ज सहायक फौजदार मारूती लक्ष्मण राजमाने (वय ५६, रा. विद्यानगर, शेळगी, सोलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन जेलरोड पोलिस ठाण्यात सहा दरोडेखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहायक फौजदार राजमाने हे सोलापूर शहर पोलिसांच्या अशोक चौक पोलिस चौकीच्या मागे असलेल्या पेट्रोल पंपावर इनचार्ज म्हणून कार्यरत आहेत. रविवारी रात्री त्यांच्या पाळीमध्ये जमा झालेली पेट्रोल पंपावरील ५ लाख रुपयांची रोकड घेऊन (एम एच १३ एम ८६०४) या दुचाकीवरुन पोलिस मुख्यालयात रोकड जमा करण्यासाठी जात होते. त्यावेळी हा प्रकार घडला.

Tags : sub inspector five lakh robbed in solapur ashok chuk police station