Tue, Sep 25, 2018 06:42होमपेज › Solapur › सोलापूर : सिंहगड कॉलेजचा विद्यार्थी भाळवणीतील शेततळ्यात बुडाला

सिंहगड कॉलेजचा विद्यार्थी शेततळ्यात बुडाला

Published On: Mar 12 2018 7:21AM | Last Updated: Mar 12 2018 7:44AMभाळवाणी : वार्ताहर

भाळवाणी (ता. पंढरपूर) येथील शेततळ्यात सिंहगड कॉलेज कोरटी महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या शरद शाशीदर राव (वय २१) याचा बुडून मृत्यू झाला. त्याच्या मृतदेहाचा शोधा शोध सुरू असून अद्याप तो सापडला नाही. मृत विद्यार्थी दत्त्रनगर( इंदापूर, ता. इंदापूर जि. पुणे) येथील रहिवासी आहे. 

कॉलेजला आज सुट्टी असल्याने इंजीनियरिंगमधील सात ते आठ जण मुले भाळवणी येथील अशोक लाले यांच्या शेतामधील शेत तळ्यात पोहण्यासाठी  गेले होते.हे शेततळे ४५ फूट खोल आहे. शरद राव याला पोहायला येत नव्हते. त्यामुळे तो मोटारीला बांधलेल्या दोरीला धरून पोहत होता. दोरी सुटल्यामुळे शरद पाण्यात गेला. पोहणार्‍या विद्यार्थ्यांचे लक्ष गेल्यानंतर शरदचा शोध घेण्यात आला. मात्र शरद दिसला नाही. यानंतर पोहणार्‍या मुलांनी घरी सांगितले. घराच्यांनी शरदचा शोध घेण्यास सुरू केली मात्र अद्यापपर्यंत शरदचा मृतदेह सापडल नाही. शोध सुरू असून मोठ्या प्रमाणात तेथे नागरिक उपस्‍थित आहेत.