माळशिरस : प्रतिनिधी
माळशिरस पंचायत समितीत कै. शंकरराव मोहीते पाटील यांचा पुतळा बसविण्यात येणार आहे. हा पुतळा बसविण्यास विरोध करण्यासाठी आज माळशिरस मध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.
सर्व ग्रामस्थ व्यापारी संघटना यांच्या वतीने बंद पुकारण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता बंदमध्दे सर्वांनी सहभाग घेतला आहे. या बंदशी राजकीय पक्ष संघटना यांचा संबध नसल्याचे बोलले जात आहे.