Sat, Jul 20, 2019 15:15होमपेज › Solapur › जीएसटी अधिकार्‍यांना सॅनेटरी पॅडचा आहेर

जीएसटी अधिकार्‍यांना सॅनेटरी पॅडचा आहेर

Published On: Jan 19 2018 2:01AM | Last Updated: Jan 18 2018 10:53PMसोलापूर : प्रतिनिधी 

सध्या भाजप सरकारने सर्वसामान्यांची लूट सुरू केली असून महिलांसाठी आवश्यक असणार्‍या सॅनेटरी पॅडवरही जीएसटी लावण्यात आली आहे. त्यामुळे सोलापूर शहर व जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने जीएसटी भवन येथे आंदोलन करण्यात आले तसेच यावेळी अधिकार्‍यांना सॅनेटरी पॅडचा आहेर करण्यात आला.

सर्वसामान्य लोकांना आवश्यक असणार्‍या गोष्टी तसेच जीवनावश्यक गोष्टींवर जीएसटी लावताना शासनाने विचार करायला हवा होता. महिलांच्या आत्मसन्मासाठी तरी शासनाने सॅनेटरी पॅडवरती जीएसटी लावायला नको होती, असे  निर्मला  बावीकर यांनी सांगितले. सर्वसामान्य महिला असतील अथवा मोठ्या कुटुंबातील महिला असतील त्यांच्यासाठी पॅड आवश्यक असते. शासनाने मोफत पुरवठा करायला हवा असताना त्यावर जीएसटी लावून महिलांचा अवमान केल्याचा आरोप  महिला राष्ट्रवादीच्यावतीने कर निरीक्षक संजय पवार यांना  मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी महिला जिल्हाध्यक्ष मंदा काळे, पक्ष निरीक्षक निर्मलाताई बावीकर, सुनीता रोटे, रेखा सपाटे, मंगला कोल्हे, मनिषा नलावडे, सायरा शेख, सिया मुजावर, रिजवान शेख आदी उपस्थित होत्या.