Sun, Aug 18, 2019 14:21होमपेज › Solapur › पंढरपूर : ७ ऑगस्‍टला 'धनगड दाखवा' आंदोलन

पंढरपूर : ७ ऑगस्‍टला 'धनगड दाखवा' आंदोलन

Published On: Aug 05 2018 9:36AM | Last Updated: Aug 05 2018 9:36AMपंढरपूर : प्रतिनिधी

एका बाजूला मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी ४ दिवसापासून पंढरपूर तहसील समोर ठिय्या मारून आंदोलन छेडले असताना आता पंढरपूर तालुक्यातील धनगर समाजही आंदोलनासाठी रस्त्यावर येत आहे. सोलापूर जिल्ह्यात धनगड दाखवा, त्यांचे नांव, पत्ते द्या म्हणून ७ ऑगस्ट रोजी धनगर समाज पंढरपूर तहसील समोर आंदोलनास बसणार आहे. 

पंढरपूर तालुका सध्या आरक्षण लढ्याचा केंद्रबिंदू बनला असून मराठा समाजाचे आरक्षण आंदोलन जोरात सुरू आहे. २ ऑगस्टपासून हजारो मराठा बांधव तहसिलदार कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनासाठी जमत आहेत. हे आंदोलन सुरू असताना आता धनगर आरक्षण कृती समितीसुद्धा एसटी समावेश आंदोलन सुरू करीत आहे. राज्य सरकारने सोलापूर जिल्ह्यात १६५० पेक्षा जास्त धनगड समाज असल्याची माहिती दिली असून हे धनगड दाखवा, त्यांचे नाव पत्ते द्या अशी मागणी धनगर समाज करू लागला आहे. या मागणीसाठी येत्या मंगळवारी ७ ऑगस्ट रोजी पंढरपूर तहसील समोर धनगर समाज आंदोलन करणार आहे.