Thu, Apr 25, 2019 06:17होमपेज › Solapur › सोलापूर : मुळेगाव तांडा येथे पोलिसांवर दगडफेड

सोलापूर : मुळेगाव तांडा येथे पोलिसांवर दगडफेड

Published On: Feb 23 2018 10:47PM | Last Updated: Feb 23 2018 10:47PMसोलापूर ः प्रतिनिधी

मुळेगाव तांडा (ता़  उ़  सोलापूर) येथे अवैध दारूभट्टीवर कारवाईसाठी गेलेल्या सोलापूर तालुका पोलिस ठाण्यातील पोलिस पथकावर अवैध धंदे करणार्‍यांनी दगडफेक केली़  या दगडफेकीत दोन पोलिस कर्मचारी जखमी झाले असून या प्रकरणी 65 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कॉन्स्टेबल शेख (262) व अकुलवार (2021) अशी जखमी पोलिस कर्मचार्‍यांची नावे आहेत. ही घटना  गुरुवारी मध्यरात्री घडली आहे़  सोलापूर तालुका पोलिस ठाणे हद्दीतील मुळेगाव तांडा (भानुदास तांडा, ता़  द़  सोलापूर) येथे चालणार्‍या अवैध धंदे दारूभट्टीवर सोलापूर तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किशोर नावंदे यांनी पोलिस ठाण्याकडील कर्मचारी, पोलिस मुख्यालयातील आरसीपीचे कर्मचारी यांच्यासह भानुदास तांड्यावर अचानक छापा टाकला़   या छाप्यात 14 लाख 56 हजार 400 रुपयांचे हातभट्टी तयार करण्यासाठी लागणारे गूळमिश्रित रसायन पोलिसांनी नष्ट केले़ 

दरम्यान, सुरेश कपूरचंद राठोड (भानुदास तांडा) यांच्या अवैधरित्या चालणार्‍या धंद्यावर पोलिसांनी धाड टाकली़ यावेळी भट्टी तयार करण्याकरिता लागणारे साहित्य, बॅटरीच्या सेलचे तुकडे, नवसागर, युरियाचे दोन पोते, हातभट्टीने भरलेल्या ट्यूब सापडल्या. या गाडीजवळ उभ्या असलेल्या चालकास पोलिसांनी पकडण्याचा प्रयत्न केला असता तो गाडीसह साहित्य घेऊन पळून गेला. या गाडीचा पाठलाग करीत असताना पोलिसांना पुणे-हैदराबाद महामार्गावर दीपक ट्रान्सपोर्टसमोर ही गाडी मिळून आली़  मात्र यावेळी संबंधित गाडीजवळ असलेल्या लोकांनी पोलिसांवर दगडफेक करून जिवे ठार मारण्याची धमकी दिली़ याप्रकरणी सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात सुभाष काशीनाथ चव्हाण, विक्रम बाबू पवार, नागेश शंकर पवार, विलास शिवाजी जाधव, सुरेश कपूरचंद राठोड, अजय पवार, लालू राठोड, सविता रमेश राठोड, इंदू राजू पवार, सनद लालू राठोड, श्रीनाथ कपूरचंद राठोड व इतर अज्ञात 40 ते 50 जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ पुढील तपास सपोनि देवडे हे करीत आहेत़

भानुदास तांड्यावर टाकण्यात आलेल्या छाप्याची कारवाई पोलिस अधीक्षक एस़ वीरेश प्रभू, अप्पर पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक किशोर नावंदे, सपोनि देवडे, पोहेकॉ गायकवाड, गुंडाळे, पवार, चवरे, टिंगरे, गवळी, तसेच पोलिस मुख्यालयाकडील आरसीपी पथकचे पोलिस कर्मचारी यांनी कारवाई पार पाडली.