Sat, Mar 23, 2019 01:57होमपेज › Solapur › पंढरपूर : मराठा मोर्चाला हिंसक वळण; वारकऱ्यांची नाराजी

पंढरपूर : मराठा मोर्चाला हिंसक वळण; वारकऱ्यांची नाराजी

Published On: Jul 22 2018 9:14AM | Last Updated: Jul 22 2018 9:13AMशेळवे : वार्ताहर

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अनेक ठिकाणी पुन्हा मोर्चे निघण्यास सुरुवात झाली आहे. ग्रामिण भागातूनही मोर्चा निघत आहे. या मोर्चाल हिंसक वळण लागले असून आज सकाळी पंढरपूर तालुक्यातील शेळवे येथील बाजीराव विहिरीपासून जवळ असलेल्या खेडभाळवणी चौकात आंदोलकांनी एसटीवर दगडफेक केली. सुदैवाने कोणतीही जिवितहानी झाली नसली तरी वारकऱ्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, बाजीराव विहिरीपासून जवळ असलेल्या खेडभाळवणी चौकात आंदोलकांनी दगडफेक केली. आषाढी एकादशीनिमित्त यात्रा स्पेशल बसवर दगडफेक करण्यात आली. यात कोणतीही जिवित हानी झाली नाही. मात्र मराठा आरक्षणासाठी चाललेल्या या आंदोलनाला ऐन आषाढी वारीच्या काळात हिंसक वळण लागत आहे. यामुळे वारकरी आणि आषाढी वारीसाठी येणाऱ्या भाविकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.