Tue, Apr 23, 2019 13:32होमपेज › Solapur › टेंभूर्णीजवळ धाडसी दरोडा, तिघांना जबर मारहाण

टेंभूर्णीजवळ धाडसी दरोडा, तिघांना जबर मारहाण

Published On: Dec 11 2017 12:34PM | Last Updated: Dec 11 2017 12:34PM

बुकमार्क करा

टेंभूर्णीः प्रतिनिधी

माढा तालुक्यातील चौभेपिंपरी येथील देवकर वस्तीवर मध्यरात्री दरोडेखोरांनी धाडसी दरोडा घातला. दरोडेखोरांनी चाकूचा आणि कुर्‍हाडीचा धाक दाखवून दोघांना जबर मारहाण करत जवळपास तीन लाख रुपयांचा ऐवज पळवून नेल्याची घटना आज, सोमवारी सकाळी उघडकीस आली. 

टेंभूर्णी पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या चौभेपिंपरी येथील देवकर वस्तीवर सुनील देवकर यांचे घर आहे. रविवारी मध्यरात्री सहा जणांच्या टोळीने घरावर धाडसी दरोडा टाकत देवकर आणि त्याच्या आई-वडीलांना चाकूचा आणि कुर्‍हाडीचा धाक दाखवत जबर मारहाण करुन घरातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम लांबवली. याबाबत टेंभूर्णी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास सुरू आहे.