Sat, Nov 17, 2018 18:29होमपेज › Solapur › पत्रकारांवर जाणीवपूर्वक गुन्हा दाखल करणे योग्य नाही : रणजित पाटील

पत्रकारांवर जाणीवपूर्वक गुन्हा दाखल करणे योग्य नाही : रणजित पाटील

Published On: Jun 06 2018 11:40AM | Last Updated: Jun 06 2018 11:40AMपंढरपूर : प्रतिनिधी 

पत्रकारावर जाणीवपूर्वक गुन्हा दाखल केला असेल तर ते योग्य नाही, पत्रकारांविषयी माझ्याही मनात आदर आणि आपुलकी आहे. सोलापूरला नेमके काय झाले याची पोलीस आयुक्तांकडून माहिती घेऊन योग्य त्या सूचना करेन अशी ग्वाही नगरविकास राज्यमंत्री तथा गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी पंढरपुरात पत्रकारांशी बोलताना दिली. 

पाटील हे पंढरपूर दौऱ्यावर आले असता शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी आमदार प्रशांत परिचारक, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, नगराध्यक्षा सौ. साधना भोसले, भाजपचे शहराध्यक्ष संजय वाईकर आदी उपस्थित होते.

यावेळी सोलापुरात पोलिस उपायुक्तांनी बातमी छापल्याचा राग मनात धरून दै. पुढारीच्या कार्यकारी संपादक आणि शहर गुन्हे वार्ताहर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या संदर्भात पंढरपूरच्या सर्व पत्रकारांनी रणजित पाटील यांना विचारणा केली. त्यावेळी बोलताना  पाटील यांनी सोलापूर पोलीस आयुक्तांशी बोलून योग्य त्या सूचना देण्याची ग्वाही दिली.