Thu, Jun 27, 2019 01:32होमपेज › Solapur › ग्रंथदिंडीने मराठी साहित्य संमेलनाची सुरवात 

ग्रंथदिंडीने मराठी साहित्य संमेलनाची सुरवात 

Published On: Feb 15 2018 8:57PM | Last Updated: Feb 15 2018 8:57PMसंत चोखोबा नगरी : प्रतिनिधी

पूर्व विदर्भाच्या झाडीपट्टीच्या रंगभूमीत पहिल्यांदाच होत असलेल्या अखिल भारतीय संत साहित्य समेंलनाला नागरिकांच्या प्रचंड उत्साहात सुरवात झाली. अर्जुनीतील प्रत्येक घरासमोरील रस्त्यावर रांगोळ्या काढून ग्रंथदिंडीचे स्वागत जनतेने केले. आज सकाळपासूनच समेलंनाप्रती उत्सुकता होती, ती ग्रंथदिंडीच्या शुभारंभाने बहरली आहे. पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर व रचनाताई गहाणे यांच्यासह मान्यवरांनी दिंडी खांद्यावर घेत शहरभ्रमणात सहभाग घेतला.

वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र व डॉ. बाबासाहेब समता प्रतिष्ठान नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आजपासून अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनांची सुरवात तुकोबा महाराजांच्या पालखीतील  ग्रंथदिंडीने करण्यात आली. ग्रंथदिंडीला राज्याचे पशुसंवर्धंन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांच्याहस्ते झेंडी दाखविण्यात आली. त्याआधी ग्रंथदिंडीची पूजा करण्यात आली. 
यावेळी संमेलनाचे संमेलनाध्यक्ष ह.भ.प. डॉ. रामकृष्ण महाराज लहवितकर, जिल्ह्याचे पालकमंत्री व स्वागताध्यक्ष ना. राजकुमार बडोले, वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील, माजी जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, नामदेव महाराजांचे वशंज नामदास महाराज, पंढरपूरचे मधुसूदन महाराज, शांताराम दुसाने नाशिक, मालुश्री विठ्ठलराव पाठील, अरविंद शिवणकर, उमाकांत ढेंगे, लायकराम भेंडारकर आदी समन्वय समितीचे पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विशेष म्हणजे या दिंडीमध्ये पंढरपूरला जाणाऱ्या वारकरांची जी वेशभुषा असते. त्या पारंपारिक वेशभुषेत 10-12 दिंडीतील वारकरी सहभागी झालेले आहेत. या दिंडीमध्ये शाळकरी मुलांच्या लेझीम पथकासह बँड पथकाचा समावेश आहे. दिंडीमध्ये राधाकृष्णाचा देखावा, विठ्ठलरुखमाई मंदिराच्या देखाव्यासह तुकोबा महाराजांची पालखी सजविण्यात आली. यात ईश्वरिय ब्रम्हकुमारी प्रजापिता यांचे पथक, बौध्द भिक्कू, नरेंद्र महाराजासेवा संपद्राय, आदिवासींचे ढोल पथक आदींनी या दिंडीला वेगळे पण आणले. या दिंडीमध्ये पुस्तक दिंडीचा सुध्दा समावेश करण्यात आला होता.