Wed, Mar 20, 2019 23:11होमपेज › Solapur › सोलापूर : डेपोमधून एसटी प्रशासनाची १४ लाखाची पेटी लंपास

सोलापूर : डेपोमधून एसटी प्रशासनाची १४ लाखाची पेटी लंपास

Published On: Dec 30 2017 2:59PM | Last Updated: Dec 30 2017 2:59PM

बुकमार्क करा
सोलापूर : प्रतिनिधी

 एसटी डेपो मधून दररोज मोठी रक्कम बालिवेस येथील स्टेट बँकेत रक्कम जमा करण्यात येते. आजदेखील १४ लाख ७६ हजार रुपये घेऊन जाताना कैशीयरची नजर चुकवून अज्ञात चोरट्याने ही रक्‍कम असलेली पेटी लंपास केली आहे. फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

कॅशियर विवेक भास्कर देशपांडे  व ड्रायव्हर अजमोद्दीन तालिकोटी वडापूर सोलापूर या बसमधून बालिवेस येथील स्टेट बँकेत शनिवारी सकाळी १४ लाख ७६ हजार रुपये घेऊन जात होते. सुरक्षा रक्षक आला नव्हता आणि ड्रायव्हर अजमोद्दीन तालिकोटी हा एसटी स्थानकात एंट्री करण्यासाठी गेला होता. कॅशियर हा एसटीमध्ये रक्‍कम असलेली पेटी ठेऊन एसटीच्या दरवाजा बाहेर चालकाची वाट पाहत थांबला होता. ड्रायव्हरच्या केबिनमधून अज्ञात चोरट्याने प्रवेश करून ही पेटी लंपास केली.

याप्रकरणी एसटी प्रशासनाकडून पोलिसांना माहिती देण्यात आली. डीसीपी पौर्णिमा चौगुले, डीसीपी अपर्णा गीते व पो.नि. संजय जगताप यांनी घटनास्थळी धाव घेतली. एसटी स्थानक प्रमुख कदम, प्रभारी डीसी जानराव हे देखील उपस्थिती होते.