Fri, Apr 26, 2019 03:22होमपेज › Solapur › शिवाजीराजे यांनी शेतकर्‍यांचे हित पाहिले : प्रा. श्रीमंत कोकाटे

शिवाजीराजे यांनी शेतकर्‍यांचे हित पाहिले : प्रा. श्रीमंत कोकाटे

Published On: Mar 16 2018 1:21AM | Last Updated: Mar 15 2018 11:08PMटेंभुर्णी : प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी राजे हे शेतकर्‍यांचे हित सांभाळणारे राजे होते. दुष्काळात त्यांनी शेतकर्‍यांना अन्न-धान्य, बैलजोडी, जनावरे दिली. वसुली थांबवून शून्य टक्के दराने विनाविलंब कर्ज दिले. असे करणारा शिवछत्रपती देशातील पहिला व शेवटचा राजा होता, त्यांच्या या धोरणाची आता गरज असल्याचे प्रतिपादन इतिहास संशोधक प्रा. श्रीमंत कोकाटे यांनी केले.

खडके वस्ती येथे जय भवानी मित्रमंडळातर्फे व ग्रा.पं. सदस्य भाऊ महाडिक यांच्या सहकार्याने श्रीमंत कोकाटे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी अ‍ॅड. कृष्णात बोबडे हे होते.

कोकाटे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी सामान्य गोरगरीब जनतेच्या कल्याणासाठी स्वराज्य निर्माण केले होते. त्याकाळात सतत वर्षानुवर्षे दुष्काळ असायचा, दोन टक्केही सिंचन नव्हते पण कुणीही आत्महत्या करीत नव्हते. कारण त्यावेळी महाराजांनी रयतेला सर्व प्रकारची मदत केली होती. दुष्काळात सर्व प्रकारची मदत देऊन रयतेचे  पालन केले जात होते. शेतकर्‍यांकडील अधिक उत्पादित धान्य योग्य मोबदला देऊन खरेदी करीत असत, त्याची साठवणूक करीत असत, तसेच तो माल जेथे मागणी आहे, तेथे विकावा असे धोरण राबविले होते. श्रमाला योग्य भाव मिळत नाही म्हणून आत्महत्या होतात, असे त्यांनी सांगितले. गरज नसताना डाळी, गहू, साखर आयात करण्याच्या शासनाच्या धोरणावर कोकाटे यांनी सडकून टीका केली. कार्यक्रमास संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन जगताप, नागेश बोबडे, शिवसेनेचे ता. उपप्रमुख मधुकर देशमुख, उपसरपंच धनाजी गोंदिल, जयवंत पोळ, दयानंद महाडिक, हरी सटाले, संतोष जाधव, प्रा. दीपक पाटील, नागेश खटके, नागनाथ वाघे, अमोल धुमाळ, सोमनाथ महाडिक, पांडुरंग महाडिक, दादा कोल्हे, विलास कोठावळे, संजय देशमुख आदी उपस्थित होते.