Wed, Apr 24, 2019 07:32होमपेज › Solapur › शिक्षक बदली; टक्केवारी निश्‍चित करा

शिक्षक बदली; टक्केवारी निश्‍चित करा

Published On: Jan 23 2018 9:37PM | Last Updated: Jan 23 2018 9:21PMसोलापूर ः प्रतिनिधी

महाराष्ट्र शासनाच्या ग्रामीण विकास मंत्रालयामार्फत 27 फेब्रुवारी  च्या जी.आर.नुसार राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत  ऑनलाईन बदली प्रक्रिया सुरू झाली असून या बदल्या नक्‍की किती होतील हे सांगता येत नसल्याने  याची  टक्केवारी निश्‍चित  ठरवावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने ग्रामीण विकासमंत्री ना. पंकजा मुंडे व सचिव आसिम गुप्ता यांच्याकडे केली असल्याची माहिती शिवानंद भरले यांनी दिली.  

राज्य शिक्षक संघाचे अध्यक्ष राजाराम वरूटे, सरचिटणीस केशवराव जाधव, कार्याध्यक्ष लायक पटेल, ज्येष्ठ सल्लागार बाळासाहेब काळे आदींनी मुंबई मंत्रालयात जाऊन शासनाच्या बदली जी.आर.मध्ये ठराविक टक्केवारी निश्‍चित करून ठेवावी, त्यामध्ये 5 टक्के प्रशासकीय बदल्या, 5 टक्के विनंती बदल्या व 5 टक्के आपसी बदल्या अशा स्वरुपाची मर्यादा असावी तसेच प्रशासकीय बदल्यांसाठी एकाच शाळेतील वा तालुक्यातील वास्तव सेवाज्येष्ठता धरावी, बदल्या या जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अधिकारात जिल्हा स्तरावरच ऑनलाईन समुपदेशनाने कराव्यात,  बदल्या या दोन टप्प्यांत व  दीर्घमुदत सुट्टीत कराव्यात, अशी मागणी केली असून यावेळी अनेक जिल्ह्यांचे अध्यक्ष व सरचिटणीस उपस्थित होते.